-डॉ. प्रदिप  महाजन

वाणी हा संवादाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. बोलण्यातून, संभाषणातून आपण आपले विचार व कल्पना व्यक्त ककरु शकतो. स्पर्श, गंध, दृष्टी, श्रवण आणि चव यांच्या ज्ञानासोबत वाणीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. मुलांच्या विकासाचा विचार करता अध्ययनामध्ये वाणीची महत्त्वाची भूमिका असते. जी मुले योग्य वयात बोलू लागतात तिच मुले ते वाचन, लेखन आणि इतर कौशल्ये अधिक परिणामकारकपणे आत्मसात करतात. मुलामध्ये योग्य वयात सुयोग्य स्पीच पॅटर्न्स आणि भाषा विकसित करण्याचे महत्त्व आता पालकांना समजू लागले आहे. असे असले तरी आपल्याला मेंदूतील वाणीच्या यंत्रणेबद्दल थोडी माहिती मिळविणे आपल्याला आवश्यक आहे. मेंदूतील अनेक भाग समन्वयाने कार्य करत असतात आणि आपल्याला भाषा समजण्यास व बोलण्यास मदत करत असतात. ब्रोकाज आणि वेर्निक्स हे मुख्य भाग असतात. या भागांचा चुकीच्या पद्धतीने विकास झाला किंवा या भागांना इजा झाली, तर भाषेमध्ये अडचण येऊ शकते. याला ‘वाचाघात’ असे म्हणतात.

personality traits
७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या
Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…

आपल्या मेंदूतील पेशी एकमेकांशी एखाद्या नेटवर्कप्रमाणे (साधारण वीजेच्या सर्किटप्रमाणे) असतात. या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती विविध इंद्रियांपर्यंत पोहोचते. या नेटवर्कमध्ये किंवा पेशींमध्ये काही अडथळा निर्माण झाला तर काही व्यंग किंवा वाचाघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात..  आपल्या मेंदूतील पेशी एकमेकांशी एखाद्या नेटवर्कप्रमाणे (साधारण वीजेच्या सर्किटप्रमाणे) असतात. या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती विविध इंद्रियांपर्यंत पोहोचते. या नेटवर्कमध्ये किंवा पेशींमध्ये काही अडथळा निर्माण झाला तर काही व्यंग किंवा वाचाघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

स्ट्रोक, डोक्याला बसलेला मार, ब्रेन ट्युमर किंवा स्मृतीभ्रंशामुळे वाचाघात होतो. लक्षात घ्या, वाचाघात हा आजार नाही हे मेंदूला इजा झाल्याचे लक्षण आहे. काही रुग्णांमध्ये वाचाघात जन्मजात असतो. परंतु अशी प्रकरणे अत्यंत दुर्मिळ असतात. जन्माच्या आधी होणाऱ्या वाढीमध्ये अडथळा निर्माण झाला असेल किंवा प्रसूतीच्या वेळी झालेल्या आघातामुळे वाचाघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत, मूल अजिबात बोलू शकत नाही किंवा अध्ययन अक्षमता दिसू येते. आघात किती तीव्र आहे यावर नुकसानाचे स्वरुप ठरत असते.

वाचाघात असलेल्या मुलांना योग्य शब्द निवडणे, लांब किंवा भरभर बोललेली वाक्ये समजणे कठीण जाते आणि ते स्लो-लर्नर होतात. अशा मुलांचा वाचनाचा व लिहिण्याचा वेग कमी असतो. कारण त्यांचा मेंदू शब्दांवर प्रक्रिया करण्यास अधिक वेळ घेतो. कृपया लक्षा घ्या, वाचाघात असलेले मूल (किंवा प्रौढ व्यक्ती) यांच्यात बौद्धिक क्षमतेची समस्या नसते. प्रौढांमध्ये स्ट्रोक हे बहुधा कारण असते आणि त्यांच्यातही मुलांसारखीच लक्षणे दिसून येतात.

वाचाघात असलेल्या व्यक्तीला भाषेतून व्यक्त होणे किंवा समजून घेणे यात दोष निर्माण होऊ शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर एक्स्प्रेसिव्ह डिसऑर्डर (ब्रोकाज अफेशा) म्हणजे मुद्यावर येणे कठीण जाणे, छोटी वाक्ये तयार करणे आणि कमीत कमी शब्दांचा वापर करणे, चुकीची वाक्यरचना निर्माण करणे होय. तर, रिसेप्टिव्ह डिसऑर्डर (वर्निक्स अफेशा) म्हणजे सांगितलेल्या गोष्टी समजणे कठीण जाणे, अक्षरांच्या आवाजात फरक न करता येणे, विसरभोळेपणा, विचलित होणे अशा समस्या येतात. या दोन प्रकाराव्यतिरिक्त आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे ग्लोबल अफेशा. यात मेंदूतील विविध भागांना गंभीर/व्यापक इजा झालेली असते आणि रुग्णाला भाषेशी संबंधित कोणतेही कार्य करता येत नाही. अॅनॉमिक किंवा अॅम्नेशिया हा सर्वात सौम्य प्रकार आहे. यात त्या व्यक्तीला व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाची योग्य नावे लक्षात राहत नाहीत. त्याचप्रमाणे इतरही काही मिश्र प्रकार आहेत.

समस्या ओळखणे आणि सुयोग्य उपचारपद्धती ठरविणे यासाठी वाणी निदानतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसत असल्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे कार्यक्रम आवश्यक असतात. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे वयही लक्षात घ्यावे लाते कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भाषेचा उपयोग बदलत असतो. वृद्ध व दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला त्याच्या गरजा सांगणे गरजेचे असते तर तरुणांना आपल्या शाळेत किंवा कार्यालयात किंवा सामाजिक वर्तुळात वावरण्यासाठी व्यक्त होणे आवश्यक असते.

वाचाघातावरील नावीन्यपूर्ण उपचारांचा विचार करता, ज्या कारणामुळे ही लक्षणे उद्भवली त्यावर म्हणजेच मेंदूच्या ज्या भागाला इजा झाली आहे त्यावर उपचार करणाऱ्या पद्धतीचा म्हणजेच रिजनरेटिव्ह मेडिसीन आणि पेशींवर आधारित उपचारपद्धतीचा विचार करावा. या उपचारपद्धतीत, इजा झालेल्या पेशींचे नूतनीकरण आणि नैसर्गिकरित्या शरीरात होणाऱ्या पेशींच्या आणि वाढीशी संबंधित घटकांचा वापर करून मेंदूतील भागाचा कायाकल्प करण्यावर भर देण्यात येतो. यात कोणतीही औषधे किंवा शस्त्रक्रिया केली जात नाही, शरीरातील उपजत क्षमतेचा उपयोग करून घेणे हा हेतू आहे. याचा अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी स्पीच आणि वर्तणुकीविषयी/ऑक्युपेशनल थेरपी या संबंधित उपचारपद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. परिणामी अधिक चांगले परिणाम साधण्यासाठी पुनर्वसन थेरपिस्टना मदत होते. त्याचप्रमाणे रुग्णाच्या शारीरिक यंत्रणेमध्ये आणि एकूण आरोग्यावर पेशीवर आधारीत उपचारपद्धतीने सुधारण घडवता येते. म्हणजेच किमान छेद देत (मिनिमली इन्व्हेसिव्ह) केलेल्या एकाच उपचाराने एकाच वेळी विविध लक्षणांवर उपचार करता येतात. त्यामुळे अशा रुग्णांना त्यांच्या भाषेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेशीवर आधारित उपचारपद्धती आणि संबंधित स्पीच रिहॅबिलिटेशन (वाणी पुनर्वसन) यांचा सर्वंकष उपयोग करणे हे परिणामकारक माध्यम आहे.

(लेखक डॉ. प्रदिप महाजन हे रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर आहेत.)