News Flash

आपल्या व्यक्तींना ‘ट्रॅक’ करता येणारं Guardians अ‍ॅप नेमकं आहे तरी काय ? जाणून घ्या सविस्तर

Truecaller ने लाँच केलं Guardians अ‍ॅप, जाणून घ्या खासियत

एखाद्याच्या फोन नंबरवरुन त्याचं नाव व त्याच्याबाबतची अन्य माहिती देणाऱ्या Truecaller या लोकप्रिय अ‍ॅपने अलिकडेच एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. स्वीडनची कंपनी Truecaller ने Guardians नावाचं एक नवीन अ‍ॅप आणलं आहे. स्वीडन आणि भारतातील टीमने १५ महिन्यांच्या कालावधीत संयुक्तपणे हे अ‍ॅप डेव्हलप केल्याचं Truecaller कडून बुधवारी सांगण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेषतः महिला सुरक्षेसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं. “वैयक्तिक सुरक्षा आणि लोकेशन शेअरिंगसाठी शेकडो अ‍ॅप्स मार्केटमध्ये आहेत. पण सर्वांपेक्षा Guardians अ‍ॅप वेगळं आहे”, असं Truecaller चे सहसंस्थापक आणि सीईओ Alan Mamedi यांनी सांगितलं. जाणून घेऊया Guardians या अ‍ॅपचे फिचर्स :

आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगचा पर्याय :-

या अ‍ॅपद्वारे तुम्ही Always Share लोकेशन सिलेक्ट करुन आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत (Guardians) नेहमी लोकेशन शेअर करु शकतात. एखाद्या ठिकाणी जाताना लोकेशन शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. तसेच, आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगचा पर्यायही मिळेल. लोकेशन शेअरिंगसोबतच तुमच्या मोबाइल बॅटरी आणि नेटवर्क स्टेटसची माहितीही समोरच्या व्यक्तीला मिळते. फोन किती वेळ सुरू राहू शकतो हे समजण्यासाठी ही माहिती कामी येते. याशिवाय कंपनी येत्या काळात आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगऐवजी स्थानिक प्रशासनाला किंवा पोलिसांना सूचना देण्याच्या पर्यायावररही काम करणार आहे.

फ्री आहे Guardians अ‍ॅप :-

जर तुम्ही ट्रू-कॉलर युजर असाल तर त्याच आयडीद्वारे Guardians अ‍ॅपमध्ये लॉग-इन करु शकतात. ट्रू-कॉलर युजर नसाल तर फोन नंबरद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करुन लॉग-इन करु शकतात. मिस कॉल देऊन ओटीपी मिळवू शकतात. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचं लोकेशन, कॉन्टॅक्ट्स आणि फोनची परवानगी द्यावी लागेल. या अ‍ॅपचा युजर इंटरफेस सोपं असून कितीही जणांसोबत लोकेशन शेअर करता येते. तसेच, पाहिजे तेव्हा लोकेशन शेअर करण्याचा पर्याय बंदही करता येतो. हे अ‍ॅप फोनच्या बॅकग्राउंडला काम करत असतं, त्यामुळे फोनच्या बॅटरीचीही बचत होते असं कंपनीने म्हटलं आहे. यात एक इमर्जन्सी बटणही दिलं असून त्यावर टॅप केल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींना(Guardians) नोटिफिकेशन जातं. हे अ‍ॅप फ्री असून येत्या काळातही यासाठी पैसे न आकारण्याचा विचार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 3:34 pm

Web Title: truecaller launched guardian personal safety app that allows location sharing check what is it and how does it work sas 89
Next Stories
1 3000 रुपयांनी स्वस्त झाला Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन, होईल 6000 रुपयांची बचत; जाणून घ्या ऑफर
2 6000mAh बॅटरी + 4जीबी रॅम, किंमत 8,999 रुपये; स्वस्त स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’
3 ‘शाओमी’चा धमाका ! Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच, किंमत 11 हजार 999 रुपयांपासून सुरू
Just Now!
X