TVS Scooty ला भारतीय बाजारात लाँच होऊन 25 वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्ताने कंपनीने ही लोकप्रिय स्कूटर दोन नव्या रंगांमध्ये लाँच केली आहे. यामध्ये कोरल मॅट आणि अॅक्वा मॅट या रंगांचा समावेश आहे.

नव्या रंगाशिवाय मॅट आवृत्ती स्कूटीमध्ये 3डी एम्ब्लेम, वेगळे ग्राफिक्स आणि टेक्स्चर्ड सीट आहे. दोन नव्या रंगांमध्ये लाँच झाल्याने या लोकप्रिय स्कूटरसाठी आता विविध नऊ रंगांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात दोन नव्या रंगांव्यतिरिक्त रेड, ग्लिटरी गोल्ड, नीरो ब्राउन, फ्रॉस्टेड ब्लॅक, नीरो ब्ल्यू, पर्पल आणि प्रिंसेस पिंक या रंगांचा समावेश आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

आणखी वाचा : सणासुदीनिमित्त TVS च्या स्टार सिटी प्लसचं “स्पेशल एडिशन”

टीव्हीएसने मॅट आवृत्तीच्या स्कूटीमध्ये मॅकेनिकली काहीही बदल केलेला नाही. यामध्ये 87.8cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 4.9hp ची ऊर्जा आणि 5.8 Nm टॉर्क निर्माण करतं. ‘स्कूटी पेप प्लस’मध्ये USB पोर्ट, साइड-स्टँड अलार्म आणि ग्लव्ह बॉक्स यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत – मॅट आवृत्तीच्या TVS Scooty Pep Plus ची किंमत 44 हजार 764 रुपये आहे. ही किंमत कंपनीच्या Babelicious मालिकेतील स्कूटर इतकी आणि स्टँडर्ड कलर मॉडेलपेक्षा पंधराशे रुपयांनी अधिक आहे.