18 January 2021

News Flash

ट्विटरचं नवीन फिचर ‘फ्लीट्स’; २४ तासांत गायब होणार पोस्ट

जाणून घ्या या नवीन फीचरविषयी..

संग्रहित छायाचित्र

ट्विटरचं (Twitter) नवीन फिचर ‘फ्लीट्स’ लवकरच भारतात सुरू होणार आहे. ब्राझिल आणि इटलीनंतर भारत हा तिसरा देश असेल, जिथे ट्विटरचं हे नवीन फिचर युजर्सना वापरता येणार आहे. या फिचर अंतर्गत २४ तासांनंतर पोस्ट दिसेनासे होतात आणि कोणतेही लाइक्‍स, रिट्विट्स किंवा पब्लिक प्रतिक्रिया दिसत नाहीत. केलेले ट्विट्स हे सार्वजनिक असण्‍यासोबत कायमस्‍वरूपी राहतात आणि रिट्विट्स व लाइक्‍स दिसत राहतात. त्यामुळे फ्लीट्स या फिचरअंतर्गत अधिकाधिक लोकांना ट्विटर मुक्तपणे अभिव्‍यक्‍त होण्यास वापरता येईल, असा यामागे विचार आहे.

हे फिचर कसे वापराल?

नवीन फ्लीट तयार करण्‍यासाठी तुमच्‍या प्रोफाइलच्‍या वरील डाव्‍या बाजूस असलेल्‍या आयकॉनवर क्लिक करा.
फोटो किंवा व्हिडिओ करण्‍यासाठी टायपिंग सुरू करा किंवा मीडिया आयकॉनवर क्लिक करा.
पोस्‍ट करण्‍यासाठी ‘फ्लीट’वर क्लिक करा.

एखाद्या व्‍यक्‍तीचे फ्लीट कसे पाहाल?

व्‍यक्‍तींचे नवीन फ्लीट्स पाहण्‍यासाठी आयकॉनवर क्लिक करा.
नवीन फ्लीट्स, तसेच जुने फ्लीट्स पाहण्‍यासाठी खाली स्‍वाइप करा.
तुम्‍ही फॉलो करत असलेल्‍या इतर अकाऊंट्समधील फ्लीट्स पाहण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्‍वाइप करा.

फ्लीट्सवरील तुमच्‍या फॉलोअर्सना प्रतिक्रिया देण्यासाठी-

डायरेक्‍ट मॅसेजेस् (डीएम) सुरू केल्‍यानंतर प्रतिक्रिया व प्रतिसाद देण्‍यासाठी बटन्‍स उपलब्‍ध आहेत.
फॉलोअर्स डीएमच्‍या माध्‍यमातून खासगीरित्या प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा इमोजीसह जलदपणे प्रतिसाद देऊ शकतात आणि डीएममध्‍ये खासगीरित्‍या संवाद सुरू ठेवू शकतात.

ट्विटर ग्रुप प्रॉडक्‍ट मॅनेजर मो अलाधम या फिचरविषयी म्‍हणाले,”ट्विटर हे लोकांना चालू घडामोडींबाबत माहिती देणारे आणि त्‍याबाबत चर्चा करण्‍यासाठी सुविधा देणारे साधन आहे. ब्राझिलमध्‍ये फ्लीट्सची चाचणी सुरू केल्‍यापासून ट्विटरवर नेटकरी त्‍यांच्‍या मनातील विचार निःसंकोचपणे शेअर करताना दिसत आहेत. सतत ट्विट न करणारे लोक फ्लीट्सच्या माध्यमातून अधिक संवाद साधू लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 2:44 pm

Web Title: twitter fleets now in india how to view someone fleet stories and how to mute them ssv 92
Next Stories
1 Xiaomi च्या शानदार स्मार्टफोनचा पुन्हा ‘सेल’, मिळेल Airtel ‘डबल डेटा’चा फायदा
2 गृहिणींना घरच्या घरी करता येतील अशी सहजसोपी योगासने
3 Jio Offer: ‘या’ प्लॅन्समध्ये मिळेल फ्री Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शन
Just Now!
X