News Flash

Twitter वर करता येणार ‘शॉपिंग’, कंपनीकडून सुरू आहे नव्या फिचरवर टेस्टिंग

ट्विटरवर लवकरच 'शॉपिंग'ची सेवाही मिळणार

लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर लवकरच युजर्सना ‘शॉपिंग’ची सेवाही मिळणार असल्याचं समजतंय. शॉपिंगच्या सेवेसाठी ट्विटर लवकरच ई-कॉमर्स सेवा सुरू करणार असून नवीन ई-कॉमर्स ले-आउटची टेस्टिंगही अँड्राइड स्मार्टफोनवर सुरू असल्याचं वृत्त आहे.

‘टेक क्रंच’च्या रिपोर्टनुसार, Twitter ने आपल्या नवीन शॉपिंग फिचरची टेस्टिंगही सुरू केली आहे. कतार देशात सर्वप्रथम ट्विटरचं नवं फिचर पाहण्यात आलं असून युकेचे सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra यांनी याबाबत सर्वात आधी माहिती दिली. कतारमध्ये काही अँड्राइड युजर्सच्या Twitter अ‍ॅपमध्ये शॉपिंग कार्ड आणि ​शॉपिंग लिंकचा पर्याय दिसत आहे. ट्विटरच्या फीडमध्येच शॉपिंग कार्ड दिसत असून निळ्या रंगाचं मोठं शॉप बटणही आहे. Twitter च्या शॉपिंग कार्डमध्ये एखाद्या प्रोडक्टच्या किंमतीबाबत व त्याविषयी अन्य माहितीही असेल.


दरम्यान, सध्या या फिचरची अँड्राइड स्मार्टफोनवर टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे पहिले हे फिचर अँड्रॉइड युजर्ससाठी येईल आणि नंतर आयफोन वापरणाऱ्यांना हे फिचर उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृतपणे शॉपिंग फिचरची घोषणा केलेली नाही, त्यामुळे या फिचरसाठी अजून वाट बघावी लागण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 4:11 pm

Web Title: twitter is testing new e commerce shopping feature in its mobile app check details sas 89
Next Stories
1 Maha Shivratri 2021: उपवास करताना काय काळजी घ्यायची?
2 छोट्या व्यावसायिकांसाठी जिओने आणली JioBusiness ऑफर, कमी किंमतीत परवडणारे प्लॅन्स; जाणून घ्या सविस्तर
3 तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पाच दिवस बंद राहणार बँका
Just Now!
X