सोशल मीडियाचा वापर वाढत असताना फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अगदी शालेय मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांचा समावेश असल्याचे पहायला मिळते. प्रत्यक्ष जीवनात बिझी झालेले अनेक जण या माध्यमातून कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी आपल्या मनातील भावनांना वाट करुन देण्यासाठी, कोणी आपल्या जुन्या मित्र-मैत्रीणींचा शोध घेण्यासाठी, कोणी आपले फोटो शेअर करण्यासाठी, तर कोणी इतरांनी टाकलेले अपडेटस जाणून घेण्यासाठी फेसबुकवर अॅक्टीव राहतात. आता आपण यापैकी नेमक्या कोणत्या प्रकारात मोडतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर पहा फेसबुक युजर्सचे हे काही प्रकार
फ्रेंडशिप करणारे युजर्स
आजकाल जवळपास प्रत्येक जण फेसबुकचा वापर करतात. प्रत्येकाची हे माध्यम वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. हे लोक मोठ्या प्रमाणात पोस्ट करतात. याशिवाय लोकांनी आपल्या पोस्टला केलेल्या कॉमेंटला प्रतिसादही देतात. हे लोक केवळ फेसबुकवरच मैत्री करत नाहीत तर त्यापलिकडे जाऊन आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातही ही मैत्री जपतात.
सेल्फीची क्रेझ असणारे युजर्स
सध्या सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले आहे. इतकेच काय या क्रेझमुळे मोबाईल कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये बदल करत चांगले सेल्फी येतील असे स्मार्टफोन तयार केले आहेत. या स्मार्टफोनचा वापर करत सेल्फी काढून ते अपलोड करण्यात अनेकांना रस असतो. या लोकांना आपले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करुन लोकांचे लक्ष वेधून घेण्यात जास्त रस असतो. या पद्धतीने हे लोक स्वतःला प्रसिद्ध बनवतात.
दुसऱ्यांवर नजर ठेवणारे युजर्स
हे लोक आपल्याला फेसबुकवर ऑनलाइन तर दिसतात पण त्यांच्या प्रोफाईलवर आपल्याला बाकी काहीच दिसत नाही. हे लोक केवळ दुसऱ्यांची प्रोफाईल चेक करत असतात. हे लोक आपल्या क्रशचे वारंवार प्रोफाईल चेक करत असतात.
खबरी ठेवणारे युजर्स
या प्रकारातील लोक सतत काही ना काही पोस्ट करत असतात. छोट्यातली छोटी गोष्टही पोस्ट करण्यात त्यांना विशेष रस असतो. या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे ते स्वतःच्या बाबतीत काही पोस्ट करत नाहीत तर ते इतर गोष्टी अपडेट करत राहतात. अनेकदा हे युजर्स स्वतःचा प्रोफाईल फोटोही दिर्घकाळ बदलत नाहीत.