अनेकदा तुम्ही बाहेर फिरायला निघतात पण ठरलेल्या ठिकाणावर पोहोचले की तेथे पार्किंगसाठी जागाच रिकामी नसते. ही अशी समस्या आहे की रोज कोणाला ना कोणाला तरी याचा सामना करावाच लागतो. जर तुम्हाला पार्किंगसाठी जागा मिळत नसेल तर गुगल मॅप्सचं एक फीचर अत्यंत कामाचं आणि उपयोगी ठरू शकतं. या फीचरद्वारे एखाद्या लोकेशनवर पार्किंग स्पेस उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळते. पार्किंग स्पेस उपलब्ध आहे की नाही याची माहिती घेतल्यानंतर तेथे जायचं की नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात. जर या फीचरचा वापर अद्यापही तुम्ही करत नसाल तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा –

– सर्वप्रथम गुगल मॅप्सचं लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल करा
– आता खाली दिसणाऱ्या Directions पर्यायावर टॅप करा
– नंतर खाली दिसणारे ‘Start’ बॉटम बार स्लाइड करा
– यानंतर तुम्हाला पार्किंगचा ‘P’आयकॉन दिसेल, याद्वारे तुमच्या लोकेशनजवळ पार्किंस स्पेस उफलब्ध आहे की नाही याची माहिती    मिळेल.

कोणतंही लोकेशन सर्च केल्यानंतर ‘P’आयकॉनद्वारेच एखाद्या परिसरात पार्किंग उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळेल. पार्किंग स्पेस खाली असेल तर तुम्हाला पोझिशन त्याच आयकॉनवर टॅप करुन मिळेल.