16 January 2021

News Flash

मुंबईच्या कंपनीने सुरू केलं ‘व्हॅक्सिन टुरिझम’, चार दिवस अमेरिकेत जाऊन घ्या करोनाची लस !

अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक पॅकेजची ऑफर...

( प्रातिनिधिक छायाचित्र )

करोना व्हायरस संकटाचा सामना करणाऱ्या भारताकडे पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सिन उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, अमेरिकेत डिसेंबरअखेरपर्यंत लस उपलब्ध होईल असं सांगितलं जात आहे. अशातच मुंबईतील एका टुरिझम कंपनीने लोकांसाठी अमेरिकेत ‘व्हॅक्सिन टुरिझम’ची ऑफर दिली आहे. अमेरिकेत चार दिवस राहून करोना व्हायरसवरील लस घेता येईल, अशी ही ऑफर आहे.

मुंबईतील Gem Tours & Travels ने व्हॅक्सिन टुरिझमची ऑफर आणली असून या ऑफरअंतर्गत लोक अमेरिकेत जाऊन करोना लस घेऊ शकतात. कंपनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक अशा पॅकेजची ऑफर देत आहे. लस घेण्यासोबतच अमेरिकेत 4 दिवस राहताही येईल. यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपयांच्या पॅकेजची घोषणा कंपनीने केली आहे. पॅकेजमध्ये मुंबईहून न्यूयॉर्कच्या विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये तीन रात्र आणि चार दिवस राहण्याची सोय, सकाळचा नाश्ता आणि व्हॅक्सिनचा एक डोस यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

याबाबत कंपनीने , “आम्ही व्हॅक्सिन टुरिझम विकसित करत आहे. आमच्याकडे व्हॅक्सिन नाहीये किंवा आम्ही ते खरेदीसुद्धा करत नाही. सर्व अमेरिकेच्या कायद्यानुसार होईल. कशाप्रकारे अमेरिका व्हॅक्सिन उपलब्ध करून देते याचीही माहिती दिली जाईल. पण आम्ही कोणत्याही प्रकारे अॅडव्हान्स किंवा डिपॉझिट घेत नाहीये. रजिस्ट्रेशनसाठी केवळ नाव, ईमेल, मोबाइल नंबर, वय, आजाराची माहिती आणि पासपोर्टची कॉपी घेतली जात आहे. पुढील प्रक्रिया अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनुसार पूर्ण करण्यात येईल”, असं म्हटलं आहे. तसेच, अमेरिका जोपर्यंत अधिकृतपणे अमेरिकी नागरिकांशिवाय अन्य लोकांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्हीही व्हॅक्सिन देऊ शकत नाही, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 9:53 am

Web Title: vaccine tourism mumbai travel firm touts us holiday packages with promise of covid shots sas 89
Next Stories
1 Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter; पाहा काय आहे खास
2 भारतीयांसाठी गुगलकडून गुड न्यूज, Google Pay बाबतचं ‘ते’ वृत्त फेटाळलं
3 दुधी भोपळ्याचा आहारात करा समावेश; ‘या’ ८ तक्रारी होतील दूर
Just Now!
X