News Flash

सावधान! वेगाने पसरणारा हा व्हायरस चोरतोय तुमचे पासवर्ड

डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तसेच इतरही पासवर्ड चोरण्यासाठी व्हायरसची निर्मिती

मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये पासवर्ड आणि बँक अकाऊंटचे डिटेल्स सेव्ह करण्याची अनेकांना सवय असते. मात्र असे करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. हे पासवर्ड कोणी चोरले तर तुमच्या अनेक व्यवहारांना यामुळे धोका उद्भवू शकतो. आता इंटरनेटमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे ज्यामुळे तुमचे क्रोम आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये सेव्ह असलेले सगळे पासवर्ड चोरु शकेल. विशेष म्हणजे या व्हायरसमुळे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे डिटेल्स सेव्ह केले असतील तर तेही चोरले जाऊ शकतात. या व्हायरसचे नाव व्हेगा स्टेलर असून हा व्हायरस संवेदनशील माहिती चोरण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याद्वारे युजरच्या कॉम्प्युटरमधील ऑटोफील डेटा चोरता येतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार तसेच इतर व्यवहारांच्यादृष्टीने हा व्हायरस धोकादायक आहे.

हा व्हायरस मार्केटींग, अॅडव्हर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन या क्षेत्रात वेगाने पसरवला जात आहे. ईमेलद्वारेही हा व्हायरस पसरवला जात आहे. या ईमेलचा सब्जेक्ट Online Store developer required आहे. या व्हायरसला publicaffairs@, info@, clientservice@ या माध्यमातून पसरवण्यात येत आहे. या ईमेलसोबत brief.doc ही अॅटॅचमेंटही पाठवली जात आहे. हा व्हायरस कॉम्प्युटरमधील .doc, .docx, .txt, .rtf, .xls, .xlsx, .pdf या फाईल्स सर्च करुन त्याद्वारेही माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हायरसची व्याप्ती जास्त असल्याने त्याचा सर्वच क्षेत्रांना धोका असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 7:36 pm

Web Title: vega malware virus that affect on your laptop and mobile stole your data
Next Stories
1 आंब्याच्या मदतीने असा उजळवा तुमचा चेहरा!
2 आयडीया देणार ४९९ रुपयांत १६४ जीबी डेटा
3 आंबा पिकतो, रस गळतो…
Just Now!
X