07 March 2021

News Flash

आता नेटवर्क नसतानाही करता येणार फ्री कॉलिंग, Vodafone Idea ने सुरू केली नवी सेवा

Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने (Vi) अलिकडेच मुंबई आणि गुजरात सर्कलमध्ये आपली वाय-फाय कॉलिंग सेवा सुरू केली. त्यानंतर आता कंपनीने दिल्ली सर्कलमध्येही ही सेवा सुरू केली आहे. तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत कंपनीने आपली वाय-फाय कॉलिंग सेवा तीन वेगवेगळ्या सर्कलमध्ये सुरू केलीये.

वाय-फाय कॉलिंग सेवा वापरण्यासाठी ग्राहकाकडे 4G सिमकार्ड असणं आवश्यक आहे. या सेवेद्वारे कोणत्याही वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करुन युजर्स मोफत कॉलिंग करु शकतात. मुख्य म्हणजे ही सेवा वारण्यासाठी युजरचा डिव्हाइस VoWiFi कॉलिंगला सपोर्ट करणारा असायला हवा. सध्या या वाय-फाय कॉलिंग सेवेला रेडमी 9 पॉवर, Mi 10T, पोको C3, पोको X3, रेडमी 9, रेडमी 9A, रेडमी 9i, पोको M2 Pro, रेडमी नोट 9, Mi 10, Mi 10i, रेडमी नोट 9 प्रो, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी 8A ड्युअल, रेडमी नोट 8 प्रो, रेडमी K20 प्रो , रेडमी नोट 7 प्रो, रेडमी नोट 7, रेडमी Y3, रेडमी 9 Prime, रेडमी 7A, रेडमी नोट 8 आणि पोको M2 वनप्लस 6, वनप्लस 6T, वनप्लस OnePlus Nord, वनप्लस 8T, वनप्लस 8, वनप्लस 8 Pro हे फोन सपोर्ट करतात. याशिवाय या लिस्टमधून सॅमसंग, व्हिवो, ओप्पो, रिअलमी यांसारख्या अनेक ब्रँड्सचा समावेश नाहीये, पण येत्या काळात लवकरच सपोर्ट मिळू शकतो.

आतापर्यंत एकूण पाच राज्यांमध्ये व्होडाफोन-आयडियाची ही सेवा सुरू झाली आहे. मुंबई-गुजरात आणि दिल्लीशिवाय गोवा आणि कोलकातामध्येही व्होडाफोन-आयडियाची वाय-फाय कॉलिंग सेवा लाँच झाली असून या यादीमध्ये लवकरच अन्य शहरांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 3:59 pm

Web Title: vi rolls out wifi calling service or vo wifi service launched check compatible devices sas 89
Next Stories
1 स्मार्टफोन मार्केटला मिळाला नवीन ‘किंग’, चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच Samsung ला झटका
2 Netflix ची मजा घेण्यासाठी आता Internet ची गरज नाही, कंपनीने लाँच केलं शानदार फिचर
3 स्वस्त झाला Xiaomi चा पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी
Just Now!
X