News Flash

 Viral Video: लिंबाचा रस काढण्याची ‘ही’ अनोखी पद्धत एकदा पाहाच

लिंबू कापण्याची गरज नाही.....

सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे त्यातच लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच अडकून आहे. या कडाक्याच्या उन्हातून शरीराला थोडासा थंडावा मिळावं म्हणून अनेकजण भर दुपारी लिंबूसरबत पिण्याचा बेत करतात. लिंबूसरबत तयार करताना लिंबाचा रस अनेकांना काढता येत नाही. काहींना तर लिंबू उभं की आडवं कापल्यावर त्यातून रस जास्त निघतो हेही माहित नसते. अशाच लोकांसाठी लिंबाचा रस काढणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय

दोन बोटात धरून लिंबाचा रस पिळून काढणं एक कला आहे. ती प्रत्येकालाच जमते असं नाही. लिंबाचे दोन भाग करून त्यातून रस काढणं तर अनेकांना कंटाळवाण वाटते. ऑस्ट्रेलियातील टिकटॉक (TikTok) युझर्स जॅकी बैहन हिने लिंबाचा रस काढण्यासाठी एक जुगाड केलाय. या जुगाडामुळे तुम्हाला कमी वेळ आणि कष्ट लागणार आहे.

जॅकी बैहनचा हा जुगाड सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करताना लिहलेय की, ‘इतक्या वर्षानंतर मल समजले की लिंबातून रस असाही काढला जाऊ शकतो.’ या व्हिडिओला आतापर्यंत चाल लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाइक आहेत.

पाहा व्हिडिओ :

@jacquibaihnDid you know this?! ##boredathome ##lemonjuice ##lemonjuicechallenge ##healthyfood ##foodie ##healthy ##nutrition ##nutritionist

BORED IN THE HOUSE – Curtis Roach

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, जॅकी बैहन या मुलीने लिंबाला कापण्यापेक्षा त्याच्या वरील बाजूस एक छिद्र पाडले अन् लिंबाला जोराने दाबले आहे. या क्रियेमुळे लिंबात असलेला रस एकत्रच बाहेर निघाला. तोही बियाशिवाय. लिंबातून रस काढण्यासाठी तुम्हाला चाकूची गरज नाही. तुम्हाला गरज आहे सुईसारख्या धारधार , ज्याने तुम्ही लिंबावर छिद्र पाडू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 3:02 pm

Web Title: viral video genius hack for squeezing lemon without slicing it nck 90
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये ‘या’ दहा सोप्या पद्धतीने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती
2 जिओला एअरटेलची टक्कर; या प्लॅनमध्ये वापरा दिवसभरात 50 GB डेटा
3 हेअर मास्क वापरण्यासाठी काही खास टिप्स
Just Now!
X