Vivo कंपनीने आपल्या Vivo S1 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जीएसटीमध्ये वाढ झाल्यानंतर कंपनीने या फोनच्या किंमतीतही वाढ केली होती. पण, आता पुन्हा एकदा कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केल्याचं वृत्त आहे. या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत. यात मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून एफ/ 1.78 अपर्चरसह 16 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, एफ/ 2.2 अपर्चरसह वाला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर, फ्रंट पॅनलवर एफ/ 2.0 अपर्चरसह 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

फीचर्स :-
Vivo S1 मध्ये 6.38 इंचाचा Full HD+ Super AMOLED डिस्ल्पे देण्यात आला आहे. वरील भागात ड्यूड्रॉप नॉचदेखील आहे. तसेच यामध्ये Flash In-Display फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. मागील बाजूस देण्यात आलेला ट्रिपल रिअर कॅमेरा हिच केवळ या स्मार्टफोनमधील लक्षवेधी बाब नाही. याशिवाय निरनिराळ्या रंगांमध्ये येणारे प्रामुख्याने बॅक पॅनलवरील ग्रेडीअंट कलर्समुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो. हा स्मार्टफोन सध्या डायमंड ब्लॅक आणि स्कायलाइन ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे. मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसरसोबत येणारा Vivo S1 हा भारतातील पहिला मिडरेंज स्मार्टफोन आहे. यामध्ये Octa-core MediaTek Helio P65 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून 18W Dual-Engine फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. तसेत यामध्ये Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/A-GPS आणि Micro-USB with USB OTG सपोर्टही देण्यात आला आहे. Ultra Game Mode हे फीचर देखील असल्याने या डिव्हाइसमध्ये बहुतांश गेम्सचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येऊ शकतो.

किंमत :-
91mobiles च्या रिपोर्टनुसार, Vivo S1 च्या किंमतीमध्ये कंपनीने एक हजार रुपयांची कपात केली आहे. पण ही कपात फक्त 4GB रॅम असलेल्या व्हेरिअंटसाठीच म्हणजे केवळ बेसिक व्हेरिअंटसाठीच आहे. त्यामुळे हे मॉडेल आता रिटेल स्टोअर्समध्ये 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर मात्र अद्यापही जुनी किंमतच दाखवली जात आहे. याशिवाय Vivo S1 च्या अन्य मॉडेल्सच्या किंमतीत कपात करण्यात आलेली नाही.