चिनी कंपनी Vivo ने गेल्या आठवड्यात भारतात नवीन स्मार्टफोन Vivo V15 लॉन्च केला होता. आता या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या फोनची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाइट बरोबरच Amazon आणि Flipkart वर देखील होत आहे. तसेच Vivo V15 फोनचा सेल १ एप्रिलपासून होणार आहे.

भारतात या फोनची किंमत २३,९९० रुपये आहे. हा फोन ‘फ्रोजन ब्लॅक’, ‘ग्लॅमर रेड’ आणि ‘रॉयल ब्लू’ रंगामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोन लॉन्च ऑफरमध्ये Vivo V15 विकत घेणाऱ्या ग्राहकांना वन टाइम स्क्रिन रिप्लेसमेंट मोफत देण्यात आले आहे. त्याच बरोबर १५ महिने नो कॉस्ट इएमआय ऑफर, २००० रुपयांची एक्स्ट्रा एक्सेंज वॅल्यू आणि एक्सेंज ऑफरमध्ये १००० रुपयांचा लॉयल्टी बेनेफिट मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

Vivo V1 स्मार्टफोनचे फीचर्स

– ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

– १२ मेगापिक्सेल+ ८ मेगापिक्सेल + ५ मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा

– ६.५३ इंचाचा अल्ट्रा फुल व्हू डिस्प्ले

– कॉर्निंग गोरिला ग्लास

– ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज

– पी ७० प्रोसेसर

-४,००० mAh बॅटरी