26 February 2021

News Flash

रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा, व्होडाफोन-आयडियाने आणली धमाकेदार ऑफर

रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फ्री अनलिमिटेड इंटरनेट डेटा

( संग्रहित छायाचित्र )

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनीच्या ग्राहकांना मोफत अनलिमिटेड डेटा वापरता येईल. पण, हा अनलिमिटेड डेटा तुम्हाला 24 तासांसाठी नव्हे तर केवळ रात्रीच्या वेळेत मिळणार आहे. जाणून घेऊया सविस्तर …

कोणत्या वेळेत मिळणार अनलिमिटेड मोफत इंटरनेट डेटा?
मोफत अनलिमिटेड डेटाचा फायदा ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत घेता येईल. पण, यासाठी युजरला 249 किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं रिचार्ज करणं अनिवार्य आहे. याशिवाय कंपनीने अन्य कोणतीही अट या ऑफरसाठी ठेवलेली नाही. विशेष म्हणजे कंपनीकडून डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळेल. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत न वापरलेल्या डेटाचा वापर शनिवारी किंवा रविवारी करता येईल.

या प्लॅन्सवर मिळेल ऑफर :-
व्होडाफोन-आयडियाच्या वेबसाइटनुसार, 249 रुपये, 299 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 499 रुपये, 555 रुपये, 595 रुपये, 598 रुपये, 599 रुपये, 795 रुपये, 819 रुपये, 1197 रुपये, 2,399 रुपये आणि 2595 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनवर ‘बिंज ऑल नाइट ऑफर’चा (Binge all night Offer) फायदा मिळेल.

Netflix आणि अ‍ॅमेझॉन युजर्सना मिळेल फायदा :-
Vodafone Idea च्या या नव्या प्लॅनचा फायदा नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमच्या युजर्सनाही मिळेल. या प्लॅनअंतर्गत युजर्स रात्रीच्या वेळेत आवडता सिनेमा किंवा वेबसीरिज डाउनलोड करु शकतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 4:07 pm

Web Title: vodafone idea to provide unlimited high speed data at night on recharge of rs 249 and above check details sas 89
Next Stories
1 स्वस्त झाला Samsung Galaxy M21, ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी; जाणून घ्या नवी किंमत
2 तुमच्याकडचं FASTag ‘फेक’ तर नाही ना?, NHAI ने दिली ‘वॉर्निंग’
3 Twitter मध्ये आलं Voice DM फिचर, आता तुमचा आवाज रेकॉर्ड करुन पाठवा मेसेज
Just Now!
X