News Flash

लिपस्टिक लावताना ‘या’ चुका टाळा

सुंदर दिसण्यासाठी काही खास टिप्स

लिपस्टिक लावणे ही आता पूर्वीप्रमाणे केवळ हौस राहिली नसून मेकअपचा दैनंदिन भाग झाली आहे. पूर्वी केवळ सण-समारंभांना जाताना लिपस्टीक लावली जात असे. मात्र, आता व्यक्तीमत्त्व खुलून दिसण्यासाठी लिपस्टिक लावल्यास त्यात काही वावगे मानले जात नाही. ही लिपस्टिक जास्त उठावदार दिसावी आणि दीर्घकाळ टिकून रहावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. महिलांकडून लिपस्टिक लावताना काही लहानशा चुका वारंवार केल्या जातात. काय आहेत या चुका आणि त्या टाळल्यास तुमचा लूक कसा जास्त चांगला होईल यासाठी शिवानी दिक्षित यांनी दिलेल्या काही खास टिप्स…

कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावणे

अनेकांचे ओठ कोरडे असतात. ओठाची त्वचा निघालेली असताना त्यावर लिपस्टिक लावल्यास ते अतिशय वाईट दिसते. मात्र, घाईघाईत अनेकजणी तशीच लिपस्टिक लावतात. परंतु तुमचे ओठ वारंवार कोरडे पडत असतील तर लिपस्टिक लावण्याआधी त्यावर व्हॅसलिन लावावे आणि मगच लिपस्टिक लावावी. त्यामुळे ओठ जास्त चांगले दिसतात.

मिसमॅच लिप लायनर

ओठांचा आकार हायलाईट करण्यासाठी लिप लायनर अतिशय महत्त्वाचे असते. हे लिपलायनर लिपस्टिकला मॅच होणारे असेल तर ओठ खुलून येण्यास मदत होते. मात्र हे लिपलायनर जर जास्त वेगळ्या रंगाचे असेल तर ते ओठ हायलाईट करण्याऐवजी मेकअप बिघडू शकतो. त्यामुळे लिप लायनर खरेदी करताना आणि लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

जुनी लिपस्टिक वापरणे

इतर सर्व गोष्टींप्रमाणेच लिपस्टिकलाही एक्सपायरी डेट असते. त्यामुळे तुमची लिपस्टीक जास्त जुनी झाली असल्यास ती ओठांवर चांगल्या पद्धतीने खुलून येत नाही. त्यामुळे चांगल्या लूकसाठी फार जुनी लिपस्टिक वापरणे टाळावे.

लिपस्टिक सेट न करणे

लिपस्टिक ओठांना लावल्यानंतर ती योग्य पद्धतीने सेट होणे आवश्यक असते. त्यासाठी ती लावल्यानंतर ओठ एकमेकांवर योग्य पद्धतीने फिरवावेत. अथवा टीश्यू पेपरने ओठांवर हलकासा दाब द्यावा. त्यामुळे लिपस्टिक चांगली लागण्यास मदत होते.

जास्त लिपस्टिक लावणे

मेकअप करताना कोणतीही गोष्ट जास्त लावणे तुमचा लूक बिघडवू शकते. त्यातच लिपस्टिक जास्त प्रमाणात लागली तर चेहरा विद्रूप दिसू शकतो. त्यामुळे लिपस्टिक योग्य त्या प्रमाणातच लावायला हवी.

दातांना लिपस्टिक लागणे

कधीकधी घाईत मेकअप करताना लिपस्टिक दातांना लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लिपस्टिक लावताना काळजीपूर्वक लावावी. लिपस्टिक लावून झाल्यावर आणि मेकअप झाल्यावरही एकदा योग्य पद्धतीने चेक करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 12:57 pm

Web Title: what are the mistakes women make while applying lipstick on lips useful tips
Next Stories
1 कंबरदुखी दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त
2 उद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत
3 त्वचेमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत
Just Now!
X