‘नवीन आय २०’ दिवाळीत

ह्युदाई ‘आय २०’ची नवीन आवृत्ती दिवाळीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने डिलरशीपसाठी नवीन आय २० पाठवणे सुरू केले असून कारचा पहिला अधिकृत टीजर सुद्धा प्रसिद्ध केला आहे. या कारसाठी विक्रेत्यांनी पूर्व नोंदणी सुरू केली असून खरेदीदारांना या कारसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

‘नवीन आय२०’ ची रचना कंपनीने नवीन सेन्सुअस स्पोर्टीनेस डिझाइनच्या धर्तीवर केली आहे.  नवीन कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात १०.२५ इंचाचा स्क्रीन सोबत फुल डिजिटल इंस्ट्रमेंट कन्सोल, अँड्रॉयड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्लेसोबत १०.२५ इंचांचा टचस्क्रन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्मार्ट आणि प्रीमियम ऑडियो सिस्टम आहे. कारमध्ये सहा एअरबॅग्स, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑडियो कंट्रोलची सुविधाही असेल.

बजाजची ‘सीटी १००’ नवीन रूपात

*  किंमत ५० हजारांपेक्षा कमी बजाज ऑटोने भारतात ‘सीटी १००’ या दुचाकीची नवीन आवृत्ती बाजारात आणली आहे. ही दुचाकी अनेक नवीन सुविधांसह प्रदशिर्त करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत जास्त जाड आणि फ्लॅट सीट,  मोठे ग्रॅब रेल, क्लियर लेन्स इंडिकेटर, एक्सटेंडेट मिरर बूट यासारखी वैशिष्टय़े दिली आहेत.

१०२ सीसी सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन दिले आहे. इंजिनचे पॉवर आउटपूट आणि टॉर्क आधीप्रमाणे ७.७ बीएचपी आणि ८ एनएम आहे. दुचाकी चार स्पीड गियरबॉक्स दिले आहेत. नवीन आवृत्ती ४६ हजार ४३२ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. १०० सीसी एन्ट्री लेवल दुचाकींमध्ये ही स्वस्त आहे.

तीन रंगात उपलब्ध -ही दुचाकी तीन रगांत उपलब्ध आहे. यात ग्लोस इबोनी ब्लॅक विथ ब्लू डिकल्स, मॅट ऑलिव ग्रीन विद येलो डिकल्स आणि ग्लॉस फ्लेम रेड विथ ब्राइट रेड डिकल्स या रंगांचा समावेश आहे.