व्हॉट्सअ‍ॅपने डिसअपेरिंग मेसेजचे फिचर वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय युझर्ससाठी हे फिचर उपलब्ध करुन दिले आहे. भारतीय युझर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर हे फिचर वापरता येणार आहे. अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस, डेस्कटॉप, कियाओएस आणि वेब व्हर्जनवर अपडेटचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुर्वीच व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप पे, ऑलवेज म्यूट आणि एनहान्स स्टोरेज टूलचे पर्याय उपलब्ध करुन दिले होते.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ब्लॉगवर या फिचरची घोषणा केली आहे. “व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज अनेकदा आपल्या फोनवर कायमचे राहतात. कुटुंबाकडून आणि मित्रांकडून आलेले मेसेज हे आठवणी म्हणून छान आहेत. मात्र यापैकी सर्वच मेसेज जपून टेवण्यासारखे नसतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काम करताना आमचा हा हेतू आहे की येथील संवाद हे तुम्हाला अधिक जवळचे वाटावेत. म्हणजेच सर्वच मेसेज तुमच्याकडे कायमचेच राहू नयेत असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी डिसअपेरिंग मेसेजचा नवीन पर्याय घेऊन आलो आहोत,” असं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Nilesh Sabale Bhau Kadam Onkar Bhojane New Show Hastay Na Hasaylach Pahije start from 27 april
Video: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची तारीख बदलली, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

डिसअपेरिंग मेसेज हे ऐच्छिक फिचर असणार आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरील मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. विशेष म्हणजे हे फिचर एखाद्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठी ऑन करण्याची सुविधा आहे. हे फिचर ऑन केल्यानंतर मेसेज जपून ठेवण्यासाठी तो कॉपी पेस्ट करणे किंवा स्क्रीनशॉर्ट काढणे असे दोन पर्याय युझर्सकडे उपलब्ध असतील.

“प्रॅक्टीकली विचार करता संवाद हे कायम जपून ठेवण्यासाठी नसतात. मात्र त्याचवेळी आपले खास मेसेज जपून ठेवायला हवेत, असं आमचं मत असल्याने आम्ही सुरुवातील सात दिवसांच्या कालावधीसाठी हे फिचर सुरु करत आहोत. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी तुम्हाला पाठवण्यात आलेली किराणा मालाची यादी किंवा एखाद्या दुकानाचा पत्ता तुमच्या चॅटमध्ये काही दिवस राहील आणि त्यानंतर तो गायब होईल,” असं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे.

तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप डिसअपेरिंग मेसेजचं फिचर कसं सुरु कराल

> आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन अपडेट करुन घ्या. हे तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन अपडेट करता येईल.

> अ‍ॅप अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट विंडो ओपन करा

> त्यानंतर कॉनटॅक्ट नेमवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डिसअपेरिंग मेसेजचे फिचर ऑन करण्याचा पर्याय दिसेल.

> तुम्ही येथे डिसअपेरिंग मेसेज पर्याय सिलेक्ट केल्यास हे फिचर काम करु लागले.

सर्व प्लॅटफॉर्मवर म्हणजेच अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस, डेस्कटॉप, कियाओएस आणि वेब व्हर्जनवर हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा ग्रुपसाठी हे फिचर तुम्ही ऑन केल्यावर त्यासंदर्भातील नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाईल. डिसअपेरिंग मेसेज तुम्ही फॉरवर्ड केल्यानंतर तो पुढील सात दिवस दिसत राहील. डिसअपेरिंग मेसेज हा जर फोटो किंवा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असेल आणि तुम्ही ऑटो डाऊनलोडचा पर्याय सुरु ठेवला असेल तर ते ऑटोमॅटिकली गॅलरीमध्ये सेव्ह होईल.

“तुम्हाला चॅटवर येणाऱ्या मीडिया फाइल्स आपोआप डाउनलोड होतील. डिसअपेरिंग मेसेज पर्याय वापरल्यास चॅटमधील मीडिया फाइल्सही आपोआप गायब होतील. मात्र ऑटो डाउनलोड पर्याय सुरु असेल तर डाऊनलोड झालेले फोटो हे मोबाईलमध्ये सेव्ह राहतील. तुमच्या मोबाइलमधील ऑटो डाउनलोडचे फिचर सुरु करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप सेटींगमधील डेटा अ‍ॅण्ड स्टोरेज युजेस पर्याय निवडू शकता,” असं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं आहे.