01 March 2021

News Flash

व्हॉट्सअॅपच्या व्हिडीयो कॉलिंगमध्ये आणखी एका फिचरचा समावेश

व्हॉट्सअॅपचं स्टेटस हे फिचर आतापर्यंत ४५ कोटींपेक्षा जास्त युजर्सनी वापरलं असून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या आता २ अरबवर गेली आहे.

व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. युजर्सना हे अॅप्लिकेशन वापरणं जास्तीत जास्त सोपं व्हावं यासाठी कंपनीतर्फे त्यामध्ये सातत्याने बदल करण्यात येतात. दिवसागणिक नवनवीन फिचर्सची भर अॅप्लिकेशनमध्ये पडते. असंच आणखी एक फिचर युजर्सच्या भेटीला येणार असून त्यामुळे तुम्ही एकाचवेळी अनेक जण व्हिडीयो कॉलिंगवर संवाद साधू शकता. फेसबुकच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. याचबरोबर फेसबुकमध्येही काही बदल करण्यात आल्याचं झुकेरबर्ग यांनी सांगितलं.

दुसऱ्या गावात किंवा परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅपचे कॉलिंग फिचर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र यामध्ये एकावेळी दोनच व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधता येतो. मात्र आता या नवीन फिचरमुळे एकावेळी अनेक जणांना एकमेकांशी व्हिडीयो कॉलिंगद्वारे संवाद साधणे शक्य होणार आहे. सध्या हे फिचर ऍन्ड्रॉईड फोनवर उपलब्ध होईल. या अॅपवरून एकावेळी तीन का चार जणांना व्हिडिओ कॉलिंग करता येईल असे सांगण्यात आले आहे. याबरोबरच व्हॉट्सअॅपवर स्टिकरचं फिचरही देण्यात येणार असल्याचं झुकेरबर्ग यांनी सांगितलं. हे फिचर याआधी फेसबुक मेसेंजर आणि हाईक या अॅप्लिकेशनवर उपलब्ध होतं. याआधी आलेलं व्हॉट्सअॅपचं स्टेटस हे फिचर आतापर्यंत ४५ कोटींपेक्षा जास्त युजर्सनी वापरलं असून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या आता २ अरबवर गेली असल्याचंही झुकेरबर्ग म्हणाले.

व्हाट्सअॅपचे सह-संस्थापक जेन कॉम यांनी फेसबुकला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. कॉम यांनी २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकला विकले होते. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपला हा निर्णय कळवला आहे. आपल्याला स्वत:साठी काही वेळ द्यायचा आहे, त्यासाठी आपण हे पद सोडत आहोत असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 5:34 pm

Web Title: whatsapp launch its new feature more than 2 people can talk on video calling
Next Stories
1 लवकर वजन कमी करायचंय? या गोष्टी आवर्जून करा
2 नेटवर्क नसलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, लवकरच वाय-फायच्या सहाय्याने लँडलाइन, मोबाइलवर कॉल करणं शक्य
3 आता फेसबुकही शोधणार तुमच्यासाठी जोडीदार, जाणूस घ्या कसा?
Just Now!
X