आजच्या धावपळीच्या जगात अनेकदा काही महत्त्वाच्या कामांचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे अनेकजण फोनमध्ये ‘रिमाइंडर’ लावून ठेवतात. पण जर व्हॉट्सअ‍ॅपवरच रिमाइंडर मिळायला लागले तर…? हो…आता तुम्हाला एका थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरच महत्त्वाच्या कामाचे Reminder मिळतील. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Any.do हे अ‍ॅप असणं आवश्यक आहे.

Any.do या अ‍ॅपद्वारे टास्क आणि रिमाइंडर सेट करता येतं, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येतात. टेक वेबसाइट Android Police द्वारे Any.do अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपसोबतच्या भागीदारीची घोषणा केली. या फीचरद्वारे युजर्ससाठी कोणतीही टास्क किंवा रिमाइंडर (कॉल किंवा शॉपिंगबाबतच्या बाबी सेट करता येतील) सेट करता येईल. इतकंच नाही तर तुम्ही सेट केलेल रिमाइंडर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टला फॉरवर्ड देखील करता येणार आहे. मोबाईलमध्ये काहीही ‘टास्क क्रिएट’ केल्यास तुम्हाला रिमाइंडर हवंय की नाही याबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर ठरवलेल्या वेळेवर तुम्हाला WhatsApp द्वारे रिमाइंडर मिळेल.

आणखी वाचा- Jio ने 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये केला बदल, आता मिळणार या सुविधा

कसं वापरायचं हे फीचर ? 
हे फीचर सक्रिय करण्यासाठी तुम्ही Any.do अ‍ॅपचा वापर करु शकतात किंवा whatsapp.any.do या लिंकवर व्हिजिट करु शकतात. अ‍ॅपमध्ये Settings मध्ये जाऊन Integrations हा पर्याय मिळेल. येथे WhatsApp वर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन नंबर टाका आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट लिंक करा. त्यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक 6 डिजिट कोड येईल. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला रिमाइंडर turn on करावं लागेल. पण, या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला Any.do या अ‍ॅपचं प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.