News Flash

व्हॉटसअॅपवरुनही करता येणार आर्थिक व्यवहार

फेब्रुवारीअखेर लाँच होणार पेमेंट फिचर

Social Media Day : संग्रहित छायाचित्र

व्हॉटसअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील जणू ताईतच झाले आहे. कधी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, कधी कामासाठी तर कधी चांगले फोटो आणि व्हिडिओज शेअर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. व्हॉटसअॅप सतत आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत आकर्षित केले आहे. यामध्ये आणखी एक भर पडणार असून व्हॉटसअॅपव्दारे पेमेंटही करता येणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून व्हॉटसअॅपच्या या फिचरबाबत चर्चा होती. मात्र आता काही दिवसांत ते प्रत्यक्षात येणार असल्याची चर्चा आहे. साधारण एका महिन्यात हे फिचर लाँच होईल आणि सर्वांना वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या व्हॉटसअॅप हे देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन असून याव्दारे पेमेंटची सुविधा सुरु झाल्यास ग्राहकांसाठी ती अतिशय आनंदाची बाब असेल.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार व्हॉटसअॅप एका बँकेसोबत आधीपासूनच याबाबतचे टेस्टींग करत होती. अखेर हे टेस्टींग शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच पेमेंटची सुविधा उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही सुविधा नागरीकांना वापरता येईल असे कंपनीने सांगितले आहे. सध्या या टेस्टींगसाठी व्हॉटसअॅपची स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेशी बोलणी सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे बँकेचे व्यवहार व्हॉटसअॅपव्दारे करायचे असल्यास त्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीनेही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात ठराविक युजर्ससोबत या नव्या फिचरचे टेस्टींग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरीही हे फिचर प्रत्यक्षात कधी सुरु होणार आणि कशीपद्धतीने काम करणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 12:10 pm

Web Title: whatsapp payment feature will be in use from next month
Next Stories
1 दुपारच्या जेवणाबाबत ‘या’ चुका टाळा
2 मिठाच्या अतिसेवनाने स्मृतिभ्रंशाचा धोका
3 ‘हे’ आहेत जॉगिंग करण्याचे फायदे
Just Now!
X