News Flash

WhatsApp युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता iOS वरून Android वर सहज ट्रान्सफर करता येणार चॅट

तुम्ही एका फोनवरून दुसर्‍या फोनवर, जुन्या फोनवरून नवीन फोनवर, iOS वरून Android वर स्विच करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जास्त खास आहे.

WhatsApp iOS Android
WhatsApp चॅट आता iOS वरून Android वर सहज ट्रान्सफर करता येणार (Photo : WhatsApp)

व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. विशेषतः तुम्ही एका फोनवरून दुसर्‍या फोनवर, जुन्या फोनवरून नवीन फोनवर, iOS वरून Android वर किंवा उलट Android वरून iOS वर स्विच करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जास्त खास आहे. कारण, आता तुम्हाला तुमची व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्री किंवा फोटो-व्हिडीओ डिलीट होण्याची चिंता करण्याची गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्ससाठी एक असं फिचर आणत आहे कि, ज्या फिचरद्वारे आपल्याला आपली चॅट हिस्ट्री एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सहज ट्रान्सफर करता येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आतापर्यंत आपल्या या नव्या फिचरवर काम करत होतं. अखेर विविध बीटा चाचण्यांनंतर हे फिचर युझर्ससाठी उपलब्ध केलं जाईल. आतापर्यंत युझर्सनी आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम बदलली कि त्यांना त्यांची जुनी चॅट हिस्ट्री गमवावी लागत होती. पण, या फीचरच्या माध्यमातून जुन्या चॅट हिस्ट्रीला iOS वरून अँड्रॉइडवर ट्रान्सफर करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये आपल्या या फीचरची घोषणा करताना म्हटलं आहे की, “हे अनेक मागण्या आणि सूचनांनंतर बनवलं गेलेलं फिचर आहे. ज्याद्वारे युझरची चॅट हिस्ट्री एका ऑपरेटिंग सिस्टममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये हलवली जाऊ शकते. हे अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि डिव्हाइस निर्मात्यासह यावर प्रचंड कष्ट घेण्यात आले आहेत. आम्ही हे फिचर लवकरच युझर्ससाठी उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहोत ज्यात तुम्ही तुमची चॅट हिस्ट्री iOS वरून Android वर न गमावता ट्रान्सफर करू शकता.”

सर्वप्रथम ‘या’ युझर्ससाठी होणार उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याच्या या प्रक्रियेत तुमचे सर्व व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस मेसेज, फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट असतील. दरम्यान, सुरुवातीला विशेषत: हे फिचर अँड्रॉइड १० किंवा त्यापेक्षा जास्त वापरणाऱ्या सर्व सॅमसंग युझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर, लवकरच हे वैशिष्ट्य सर्व अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध होईल. त्यामार्फत युझरने अगदी आपला फोन जरी बदलला तरी देखील तो त्याच्या सर्व जुन्या चॅट्स एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सहजपणे ट्रान्सफर करू शकतो.

अशी ट्रान्सफर करा WhatsApp चॅट हिस्ट्री

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचं फिचर सुरुवातीला फक्त सॅमसंगसाठीच आणलं गेलं आहे. यासाठी, तुमच्याकडे सॅमसंग स्मार्ट स्विच अ‍ॅप व्हर्जन ३.७.२२.१ किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. यासह, तुम्हाला तुमचं व्हॉट्सअ‍ॅप आयओएस देखील अपडेट करावं लागेल.

  • तुमचा सॅमसंग फोनला एका केबलने तुमच्या आयफोनला कनेक्ट करा.
  • आपला डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी सॅमसंग स्मार्ट स्विच अ‍ॅपने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करा.
  • आता तुम्हाला तुमचा आयफोन कॅमेरा वापरून नवीन डिव्हाइसवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितलं जाईल.
  • तुमच्या iPhone वर Start वर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
  • आता तुम्ही तुमचे Samsung डिव्हाइस सेटिंग करणं सुरू ठेवू शकता.
  • सेटअप पूर्ण केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसवर केलेल्या नंबरनेच लॉगिन करा.
  • तिथे पॉप-अप दिसेल, Import बटणावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
  • आता आपल्या सर्व चॅट्स पाहण्यासाठी आपलं नवीन डिव्हाइस अ‍ॅक्टिव्हेट करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 6:34 pm

Web Title: whatsapp users can easily move chat history from ios to samsung gst 97
Next Stories
1 आनंद महिंद्रा म्हणाले, “ही तर फेक न्यूज मी असं बोललोच नाही”
2 Teachers day 2021: शिक्षक दिन का करतात साजरा? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
3 शरीरात रक्ताची कमतरता जाणवते? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!
Just Now!
X