डॉ. शुभांगी महाजन

तुमचे केस अकाली पांढरे होत आहेत का?

breast cancer among young women marathi news
तरुण महिलांमधील स्तनाच्या कर्करोगात वाढ! नियमित तपासणी करण्याचे डॉक्टरांचे आवाहन…
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

केस पांढरे होणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत, पन्नास टक्के लोकांचे कमीतकमी पन्नास टक्के केस पांढरे होण्याची शक्यता असते. कॉकेशियन्समध्ये वयाच्या विसाव्या वर्षांआधी, एशियन्समध्ये वयाच्या पंचविशीपूर्वी आणि आफ्रिकन लोकांमधे वयाच्या तिशीपूर्वी केस पांढरे होण्यास सुरुवात झाली, तर ते ‘अकाली (प्रिमॅच्युअर) ग्रेयिंग’ म्हणून ओळखले जाते. वैद्यकीयदृष्टय़ा याला ‘अकाली कॅनिटीज’ही म्हणतात आणि बऱ्याचदा तरुणांमधील न्यूनगंडाचे हे एक प्रमुख कारण ठरते.

केसांना रंग कसा मिळतो?

मानवी शरीरावर केसांची लाखो मुळे (फॉलिकल्स) असतात. यात मेलॅनिननामक नैसर्गिक रंगद्रव्य तयार होते, जे केसांना रंग देण्यास कारणीभूत असते. कालांतराने केसांचे फॉलिकल्स रंगद्रव्य पेशी गमावतात आणि केस पांढरे व्हायला लागतात.

केस अकाली पांढरे होण्याची कारणे

वयानुसार केसांचा रंग बदलणे साहजिक आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात झाली तर मग मात्र ती चिंतेची बाब ठरते. वयाशिवाय याची अनेक कारणे असू शकतात.

शरीरात जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता-

बी-६, बी-१२ जीवनसत्त्व,  बायोटिन, डी जीवनसत्त्व किंवा ई जीवनसत्त्व यांची कमतरता, शरीरात लोह व लोह साठवणारे सीरम फेरीटिन, तांबे, सेलेनिअम, प्रथिने आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल-सी) कमी प्रमाणात असणे अकाली ग्रेयिंगला कारणीभूत ठरू शकते.

अनुवांशिकता

काही व्यक्तींमधे केसांची अकाली ग्रेयिंग मोठय़ा प्रमाणात अनुवांशिकतेशी जोडलेली असते. डाऊन सिंड्रोम,  वर्नर सिंड्रोम यांसारख्या अनुवांशिक आजारांमध्येही केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

ऑक्सिडेटिव्ह ताण

फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांचा प्रतिकार करण्यासाठी जेव्हा शरीरात पुरेसे अँटीऑक्सिडंट नसतात, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह ताण असंतुलन निर्माण होते. फ्री रॅडिकल्स हे अस्थिर रेणू असतात जे पेशींचे नुकसान करतात आणि वृद्धत्व आणि आजारपणात योगदान देतात.

काही वैद्यकीय विकार

थायरॉईडचे विकार आणि काही ऑटोइम्युन आजार यामुळेही केस अकाली पांढरे होऊ  शकतात.

औषधे

क्लोरोक्वीन (मलेरियासाठी वापरल्या गेलेल्या), मेफेनिसिन (एक स्नायू शिथिल करणारा), फिनालिथियोरिया (डीएनए चाचणीमध्ये वापरला जाणारा), ट्रायपेरानॉल (कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरला जाणारा), फ्लोरोब्युट्रोफिनोन आणि डिक्सरायझिन (विविध मनोविकार विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या) औषधांसह काही विशिष्ट औषधांचे सेवन.

शारीरीक आणि मानसिक ताण

असा सहसा विचार केला जातो की ताणतणावामुळे केस अकाली पांढरे होण्याची शक्यता असते.  तथापि अभ्यासानुसार हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

धूम्रपान

वैद्यकीय साहित्यानुसार धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा अडीच पट जास्त आहे.

केसांसाठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने

केमिकल हेअर डाय आणि केसांची उत्पादने, अगदी श्ॉम्पूदेखील अकाली केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात. यापैकी अनेक उत्पादनांमध्ये हायड्रोजन पेरोक्साईडसारखे हानिकारक घटक असतात आणि त्यांचा अतिवापर केसातील मेलॅनिन कमी करण्यास कारणीभूत ठरतो.

याचे निदान कसे केले जाऊ  शकते?

अकाली कॅनिटीजचे निदान प्रामुख्याने क्लिनिकल आहे. ज्या तरुणांच्या कुटुंबात अकाली ग्रेयिंगची हिस्ट्री नसते अशा तरुणांमध्ये शरीरातील जीवनसत्त्वे आणि इतर खनिजांची रक्तातील मात्रा तपासण्यासाठी डॉक्टर त्यासंबंधित चाचण्या करण्याचा सल्ला देऊ  शकतात.

यावर उपलब्ध उपचार

पुरेसे संशोधन होऊनही कॅनिटीजचे ठरावीक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि यासाठी पूर्णत: प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. तरीही काही निवडक उपचार अंशत: फायदेशीर ठरतात.

  • जर अनुवांशिकता किंवा वृद्धत्व हे अकाली ग्रेयिंगचे कारण असेल तर कोणतीही गोष्ट त्या प्रक्रियेस उलट करू शकत नाही.
  • जीवनसत्त्वे, खनिजे व अँटीऑक्सिडंटयुक्त पौष्टिक आहार, बायोटिन, कॅल्शियम पॅन्टोथेनेट, जस्त, तांबे आणि सेलेनियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या विविध संयोजनांसह पौष्टिक पूरक आहार घेणे. सीफूड, अंडी आणि मांस जीवनसत्त्व बी-१२चे चांगले स्रोत आहेत आणि दूध, चीज, ड जीवनसत्त्वाचे उत्कृष्ट स्रोत आहेत. भाज्या आणि फळांसह भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंटयुक्त आहार घेतल्यास केसांचा  पांढरे होण्यापासून बचाव होऊ  शकतो. अँटिऑक्सिडेंट-समृद्ध पदार्थामध्ये ताजी फळे आणि भाज्या, ग्रीन टी, ऑलिव्ह तेल, मासे यांचा समावेश होतो. ग्रीन टी पॉलीफिनॉल, सेलेनियम, तांबे, फायटोइस्ट्रोजेन आणि मेलॅटोनिन यांसारख्या विशिष्ट अँटि-एजिंग कंपाऊंडचा उपयोग ग्रेयिंगची तीव्रता कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • वैद्यकीय आजारांवर योग्य औषधोपचार (उदा. थायरॉईडच्या आजारांवर उपचार).
  • नैसर्गिक पदार्थाचा वापर
  • केसांना काळे करण्यासाठी खालील पारंपरिक उपचार उपलब्ध आहेत: अमलाकी (एम्ब्लिका ऑफिसिनलिस), भृंगराज (एक्लिपटा अल्बा), मूनकेक बियाणे (स्टेरकुलिया प्लॅटनिफोलिया) आणि कमळांचे खोड (झिजिफस स्पाइना-क्रिस्टी).
  • उपलब्ध औषधे : पी-एमिनोबेन्झोइक अ‍ॅसिडचा (पीएबीए) मोठय़ा प्रमाणात डोस घेतल्यानंतर तात्पुरते केस काळे होण्याची नोंद झाली आहे. तसेच प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे मेलेनोसाइट वाढ आणि मेलेनोजेनच्या सर्वात शक्तिशाली उत्तेजकांपैकी एक आहेत.
  • कॅमोफ्लाज पद्धती – या थेरपीचा मुख्य भाग म्हणजे केसांना कलर करणे. सध्या वापरल्या जाणाऱ्या केसांच्या रंगांचे प्रमुख प्रकार : तात्पुरते (टेम्पररी) रंग, नैसर्गिक रंग (उदा. मेंदी), अर्ध-कायम रंग, आणि कायम टिकणारे रंग.