आपल्या दैनंदिन आयुष्यातील अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपण रोज वापरतो पण त्याबाबतच्या ठराविक गोष्टी आपल्या लक्षातही येत नाहीत. आता हेच पाहा ना सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा आपण कोणते काम करत असू तर ते असते दात घासण्याचे. यासाठी वापरण्यात येणारी टूथपेस्ट आपल्यापैकी प्रत्येक जण वर्षानुवर्षे वापरत आहेत. पण विविध कंपन्यांच्या या टूथपेस्टवर सर्वात खालच्या बाजूला एक विशिष्ट रंग असतो. आता हा रंग नेमका कशासाठी असतो आणि तो काय दर्शवतो याबाबत फारच कमी जणांना माहीती असेल. यामध्ये लाल, निळा, हिरवा आणि काळा असे ४ रंग असतात. त्या विशिष्ट टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ आहेत की नैसर्गिक याबाबतची माहीती हे रंग देतात. तर जाणून घेऊयात टूथपेस्टच्या खालच्या बाजूला असणाऱ्या या वेगवेगळ्या रंगांविषयी…

काळा रंग

हा रंग अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये रासायनिक पदार्थ असल्याचे सूचित केले जाते. त्यामुळे ही टूथपेस्ट घ्यायची का नाही याबाबत विचार करणे आवश्यक आहे हे नक्की.

लाल रंग

हा रंग असलेल्या टूथपेस्टमध्ये काळ्या रंगापेक्षा काही प्रमाणात कमी धोका असतो. कारण ही पेस्ट रासायनिक पदार्थांबरोबरच नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन तयार केली जाते.

निळा रंग

ही टूथपेस्ट पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन तयार केलेली असते. तर यामध्ये काही औषधी पदार्थांचाही वापर केलेला असतो. त्यामुळे आरोग्यासाठी ही पेस्ट अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे तुम्ही दात आणि हिरड्या बळकट करण्याचा विचार करत असाल तर पेस्टच्या खालच्या बाजूला निळा रंग असेल असे बघा.

हिरवा रंग

हा रंग म्हणजे टूथपेस्टमध्ये केवळ नैसर्गिक पदार्थांचा वापर केलेला असतो. त्यामुळे लहान मुलांसाठी तसेच वयस्कर व्यक्तींसाठी तुम्ही या पेस्टचा नक्कीच विचार करु शकता.