27 September 2020

News Flash

Xiaomi Independence Day Sale : ‘रेडमी K20 प्रो’वर 4,000 रुपये डिस्काउंट

सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच कंपनीच्या एक्सेसरीजवर ऑफर्स

Xiaomi कंपनीच्या Independence Day Sale ला आजपासून म्हणजे 6 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच कंपनीच्या एक्सेसरीजवर ऑफर्स मिळतील. शाओमीचा हा सेल अधिकृत वेबसाइट Mi.com वर 11 ऑगस्टपर्यंत सुरू असेल.

Xiaomi Independence Day Sale हा सेल Amazon Prime Days आणि Flipkart Big Saving Days सेलचाही हिस्सा आहे. या सेलमध्ये रेडमी के20 प्रो हँडसेटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. तर, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 प्रो आणि रेडमी नोट 9 हे फोनही विक्रीसाठी उपलब्ध असतील. या सेलमध्ये रेडमी के20 प्रोच्या किंमतीत 4000 रुपयांची कपात झाली आहे. आता रेडमी के20 प्रो (6 जीबी रॅम व 128 जीबी इन्बिल्ट स्टोरेज व्हेरिअंट) सेलमध्ये 22 हजार 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. “या सेलमध्ये Redmi Power Bank फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर Redmi Earbuds S ची किंमत 1,599 रुपये असेल”, अशी माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. पण, किंमतीतील कपात फक्त गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड Mi VIP क्लब मेंबर्ससाठी असेल, असं कपनीच्या सेलबाबत माहिती देणाऱ्या पेजवर नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे रेडमी के20 प्रोवरील चार हजार रुपयांच्या कपातीचा फायदा केवळ याच सदस्यांना मिळेल.

याशिवाय कंपनी या सेलमध्ये VIP क्लब मेंबर्ससाठी 32 इंचाचा Mi TV 4A Pro LED TV केवळ 11,999 रुपयांमध्ये देत आहे. तर, Mi Smart Band 4A ची किंमत 2,099 रुपये असेल. म्हणजे सेलमध्ये स्मार्ट बँडवर 200 रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय, Mi Notebook 14 Horizon Edition या लॅपटॉपवर 2,000 रुपये सवलत आहे. कंपनीचे इकोसिस्टिम प्रोडक्ट्स आणि एक्सेसरीज देखील सेलमध्ये उपलब्ध आहेत. VIP क्लब मेंबर्ससाठी शाओमी Mi Screen Protect 299 रुपयांमध्ये तर, Mi TV साठी एक्टेंडेड वॉरंटी केवळ 399 रुपयांमध्ये घेण्याची ऑफरही आहे.

रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 प्रो आणि रेडमी नोट 9 चा सेल कधी? :-

Redmi Note 9 Pro Max चा सेल 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. तर, 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी हा सेल दुपारी 2 वाजता असेल. Redmi Note 9 स्मार्टफोनचा सेल 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट दुपारी 2 वाजता असेल. तर, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सेल असेल. याशिवाय, Redmi Note 9 Pro स्मार्टफोनसाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:42 pm

Web Title: xiaomi independence day sale 2020 best deals on redmi k20 pro to mi tv to mi band 4 check details sas 89
टॅग Independence Day
Next Stories
1 सॅमसंगने आणला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2, जाणून घ्या फीचर्स
2 सहा कॅमेऱ्यांचा Realme 6 Pro आला नवीन व्हेरिअंटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3 48MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची दमदार बॅटरी, 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनचा ‘सेल’
Just Now!
X