23 September 2020

News Flash

Xiaomi चा 5G सपोर्टसह तब्बल 108 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, आज होणार लॉन्च

प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना वायरलेस पावर बँक मोफत...

Xiaomi आज (दि.8) भारतात आपला Mi 10 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 5G सपोर्ट आणि तब्बल 108 MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi 10 हा स्मार्टफोन एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाईल. शाओमी Mi 10 या फोनसोबत अन्य काही प्रोडक्ट्स लॉन्च करण्याचीही शक्यता आहे. यामध्ये Mi Box आणि Mi True Wireless Earphones 2 यांचा समावेश असू शकतो. हा लॉन्च इव्हेंट दुपारी १२ वाजेपासून सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलद्वारे हा इव्हेंट लाइव्ह बघता येईल. कंपनीने Mi 10 स्मार्टफोन आधीपासूनच अॅमेझॉन इंडियावर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला आहे. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना वायरलेस पावर बँक मोफत दिली जात आहे.

Mi 10 हा फोन 31 मार्च रोजी लॉन्च केला जाणार होता. पण, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने या फोनची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता केंद्र सरकारने इ-कॉमर्स कंपन्यांना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक नसलेल्या सामानांची परवानगी दिल्यामुळे Xiaomi ने Mi 10 लॉन्च करण्याची घोषणा केलीये. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मागील बाजूला तब्बल 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह चार कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे.

फीचर्स –
Mi 10 हा फोन कंपनीने फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये Mi 10 Pro सोबत लॉन्च केला होता. पण प्रो, व्हेरिअंट भारतात लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे. कारण, कंपनीने केवळ Mi 10 या फोनचाच टीझर जारी केला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असेल. फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा तब्बल 108 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,780 एमएएच क्षमतेची बॅटरीही आहे. फोनमधील अन्य फीचर्सची माहिती अद्याप मिळालेली नाही.

किंमत –
Mi 10 ची किंमत किती असेल याबाबत कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही. पण, शाओमीचे भारतातील प्रमुख मनू कुमार जैन यांनी यापूर्वी हा फोन प्रीमियम सेगमेंटमधील असेल असे म्हटले होते. म्हणजे हा फोन महाग असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या फोनची किंमत (बेसिक मॉडेल) भारतीय चलनानुसार जवळपास 42,400 रुपये आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 10:55 am

Web Title: xiaomi mi 10 india launch today know specifications expected price and all details sas 89
Next Stories
1 दारुसाठी होणाऱ्या गर्दीवर तोडगा, दिल्ली सरकारने सुरू केली ‘ऑनलाइन टोकन’ व्यवस्था
2 शिमला : रशियन प्रेयसीसोबत होता लग्नाचा प्लॅन, पण ट्रकमधून लपून जात असताना…
3 स्वस्त झाला OnePlus चा स्मार्टफोन , कंपनीकडून किंमतीत भरघोस कपात
Just Now!
X