Xiaomi ने Mi A2 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. तब्बल 20 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या फोनच्या प्री-बूकिंगलाही आजपासून सुरूवात झाली आहे. या फोनच्या मागच्या बाजूला 20 आणि 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फीप्रेमींसाठी पुढील बाजूसही 20 मेगापिक्सल कॅमेरा आहे. दुपारी १२ वाजेपासून अॅमेझॉन आणि Xiaomi च्या संकेतस्थळांवरुन प्री-बूकिंग करता येणार आहे. त्यानंतर १२ ऑगस्टपासून फोनच्या शिपींगला सुरूवात होईल आणि १६ ऑगस्टच्या आधी ग्राहकांच्या हातात पहिला Mi A2 फोन असेल असं कंपनीने सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आपल्या ग्रँड इव्हेंटमध्ये कंपनीने Mi A2 आणि Mi A2 Lite हे दोन स्मार्टफोन सादर केले होते. या दोन्ही फोनबाबत मागच्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती. अखेर आज Mi A2 हा स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे. याशिवाय या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेलं व्हेरिअंटही असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र या व्हेरिअंटची किंमत किती असणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

स्पेसिफिकेशन –
Display : 5.99-inch
Processor : 1.8GHz octa-core
Front Camera : 20-megapixel
Resolution : 1080×2160 pixels
RAM : 4GB
OS : Android 8.1 Oreo
Storage : 64GB
Rear Camera : 20-megapixel
Battery Capacity : 3000mAh