News Flash

तुमच्या साध्या टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’, Xiaomi ने लॉन्च केलं भन्नाट डिव्हाइस

'अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक'ला टक्कर...

(Xiaomi’s Mi Box 4K runs Android TV)

‘शाओमी’ कंपनीने भारतात आपला पहिला ऑनलाइन स्ट्रीमिंग मीडिया प्लेयर अर्थात Mi Box 4K हे डिव्हाइस लॉन्च केलं आहे. दिसायला अगदी लहान असलेल्या या डिव्हाइसमध्ये फीचर्स मात्र शानदार आहेत. या डिव्हाइसच्या मदतीने तुमच्या जुन्या साध्या टीव्हीवरही स्मार्ट टीव्हीचा आनंद घेता येईल. याद्वारे ‘अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक’ला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

शुक्रवारी एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये शाओमी कंपनीने Mi 10 5G स्मार्टफोन लॉन्च केला. त्यासोबतच कंपनीने Mi Box 4K स्ट्रीमिंग डिव्हाइसही भारतीय बाजारात उतरवण्याची घोषणा केली. HDMI पोर्टद्वारे हे डिव्हाइस कोणत्याही टीव्हीला कनेक्ट करता येतं. कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ फीचर असून युजर्सना Android TV वर उपलब्ध हजारो अ‍ॅप्स आणि सर्व्हिस वापरता येतात. यामध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, Disney+ Hotstar यांसारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवांचा समावेश आहे. Mi Box 4K हे अँड्रॉइड टीव्ही 9 पायवर कार्यरत असणारं डिव्हाइस आहे.

Mi TV Box 4K दिसायला साध्या सेट-टॉप बॉक्सप्रमाणे आहे आणि साध्या सेट-टॉप बॉक्सप्रमाणेच केवळ HDMI केबलद्वारे कोणत्याही टीव्हीशी कनेक्ट करता येते. हे डिव्हाइस क्वॉड-कोर अ‍ॅमलॉजिक प्रोसेसरवर कार्यरत असून यात 2 जीबी रॅम + 8 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. यात HDR 10 फॉर्मेटसोबतच 4K कंटेंट स्ट्रीमिंगची सुविधा मिळते. डिव्हाइसमध्ये 4के आणि एचडीआर कंटेंट सपोर्ट करणारे नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारखे सर्व प्लॅटफॉर्म सहज स्ट्रीम करता येतात. या बॉक्समध्ये Xiaomi च्या टीव्हीमध्ये असणारा पॅचवॉल इंटरफेस नाहीये, त्याऐवजी Mi Box 4K केवळ स्टॉक अँड्रॉइड टीव्ही इंटरफेसवर काम करतो. ज्यांच्याकडे साधा टीव्ही आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. Mi Box 4K मध्ये युएसबी पोर्ट आणि 3.5 मिलिमीटर डिजिटल आउट सॉकेट देखील आहे.  तसेच या डिव्हाइसमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट अल्ट्रा देखील आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपमधील कंटेंट(4K)थेट टीव्हीवर बघू करु शकतात.

किंमत आणि उपलब्धता :-
Mi Box 4K ची भारतात किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 10 मे अर्थात उद्या दुपारी 12 वाजेपासून Mi Box 4K साठी फ्लिपकार्ट, Mi.com, Mi Home Stores आणि Mi Studio Stores वर सेल सुरू होईल. लवकरच कंपनीच्या पार्टनर स्टोअर्समध्येही हे डिव्हाइस विक्रीसाठी उपलब्ध असेल. Mi Box 4K खरेदी करणाऱ्यांना काही खास ऑफर्सही कंपनी देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 5:11 pm

Web Title: xiaomi mi box 4k launched in india at rs 3999 to take on amazon fire tv stick know all details sas 89
Next Stories
1 PUBG Mobile साठी नवीन अपडेट, शानदार फीचर्समुळे अजून वाढली गेमची मजा
2 ‘करोना हेल्पलाइन’पेक्षा मद्यासाठी गुगलवर झुंबड
3 भारतात ‘स्वस्त’ iPhone ची विक्री कधीपासून? रजिस्ट्रेशनला झाली सुरूवात
Just Now!
X