News Flash

स्वस्तात Mi TV Stick खरेदी करण्याची संधी, २६ मार्चपर्यंत ऑफर

२६ मार्चपर्यंत Mi TV Stick स्वस्तात करा खरेदी...

(फोटो - शाओमी)

जर तुम्ही Xiaomi Mi TV Stick खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कंपनीने ‘एमआय सुपर सेल’अंतर्गत Xiaomi Mi TV Stick स्वस्तात उपलब्ध केली आहे. हा सेल २६ मार्चपर्यंत सुरू असेल.

‘एमआय सुपर सेल’मध्ये कंपनीने Xiaomi Mi TV Stick ची किंमत ३०० रुपयांनी कमी ठेवली आहे. Mi TV Stick ची मूळ किंमत 2,799 रुपये आहे, पण सेलमध्ये Mi TV Stick 2, 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ट्विटरद्वारे कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुन किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन (mi.com) Mi TV Stick खरेदी करता येईल.

Xiaomi Mi TV Stick अँड्रॉइड टीव्ही 9 वर कार्यरत आहे. यामध्ये युजर्सना गुगलच्या प्ले स्टोअरचाही अ‍ॅक्सेस मिळतो. Mi TV स्टिकद्वारे अ‍ॅमेझॉनच्या Fire TV Stick ला टक्कर देण्याचा शाओमीचा प्रयत्न आहे. नवीन ‘एमआय स्टिक’चं डिझाइन जवळपास अ‍ॅमेझॉनच्या फायर टीव्ही स्टिकप्रमाणेच आहे. Mi TV Stick केवळ ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. तर, स्टिकच्या रिमोट कंट्रोलसाठीही याच कलरचा पर्याय देण्यात आला आहे. गुगल असिस्टंट व्हॉइस कंट्रोल फीचरला हे रिमोट सपोर्ट करतं. 1 जीबी रॅम आणि 8जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Mi TV Stick मध्ये क्वॉड-कोर Cortex-A53 CPU आणि ARM Mali-450 GPU आहे. अँड्रॉइड टीव्ही 9 वर कार्यरत असलेल्या या स्टिकमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सपोर्ट मिळेल. Mi TV Stick हे शाओमी कंपनीचं दुसरं स्ट्रीमिंग डिव्हाइस आहे. यापूर्वी कंपनीने Mi Box 4K देखील लाँच केला होता.

आणखी वाचा- फक्त तीन दिवसात विकले 2300 कोटी रुपयांचे फोन, लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात ‘बंपर’ विक्री

Mi TV स्टिकद्वारे अ‍ॅमेझॉनच्या Fire TV Stick ला टक्कर देण्याचा शाओमीचा प्रयत्न आहे. Amazon Fire TV Stick ची किंमत 3,999 रुपये आहे. तर शाओमीने आपल्या Mi TV Stick ची किंमत Mi 2 हजार 799 रुपये इतकी ठेवली आहे. पण सेलमध्ये Mi TV Stick 2, 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:00 pm

Web Title: xiaomi mi tv stick gets a price cut as a part of mi super sale check new price and specifications sas 89
Next Stories
1 अटी न आवडल्यास १५ दिवसांत रद्द करता येणार पॉलिसी, विमाधारकांसाठी चांगली बातमी
2 OnePlus 9 सीरिज भारतात लाँच, कंपनीने OnePlus Watch देखील आणलं; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3 Vi युजर्सना झटका, सर्व सर्कलमध्ये महाग झाले प्लॅन्स; १०० रुपयांपर्यंत वाढली किंमत
Just Now!
X