Redmi Note 9 सीरिजमध्ये 30 एप्रिल रोजी अजून एक नवीन स्मार्टफोन दाखल होणार आहे. Xiaomi ने सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली आहे. कंपनीचा हा नवा फोन Redmi Note 9 असू शकतो.  गेल्या महिन्यात कंपनीने Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे फोन लॉन्च केले, त्यावेळीच Redmi Note 9 हा फोनही लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावेळी याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती.

कंपनीने ट्विटरवर शेअर केलेल्या टीझरनुसार, शाओमी 30 एप्रिल रोजी नवीन रेडमी नोट 9-सीरिज फोन लॉन्च करणार आहे. कंपनी हा फोन एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे लॉन्च करेल. मात्र, हा फोन कोणता आहे आणि यात कोणते फीचर्स आहेत याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार शाओमी रेडमी नोट 9 फोन चीनमध्ये Redmi 10X च्या रुपात सादर करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हिलियो जी 85 प्रोसेसरसह 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी हा फोन क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह आणेल अशी चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच शाओमीने रेडमी नोट 9एस हा फोनही लॉन्च केला आहे. त्यानंतर आता रेडमी नोट 9 सीरिजमध्ये कंपनी अजून एक फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.