योगा आणि अ‍ॅरोबिक व्यायामामुळे महिलांमधील निद्रानाशाची समस्या कमी होत नाही. योगा आणि अ‍ॅरोबिक व्यायामामुळे महिलांमधील निद्रानाशाची समस्या कमी होते, हा समज तज्ज्ञांनी खोडून काढला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

तज्ज्ञांच्या मते बऱ्याच मध्यमवयीन स्त्रियांना किमान ५० मिनिटे निद्रानाशाची समस्या जाणवते. बरेचदा यात झोपच लागत नाही किंवा मध्येच जाग येते. याआधी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार निद्रानाशापासून मुक्तता अथवा स्वास्थ्यपूर्ण निद्रा राखण्यासाठी योगा व अ‍ॅरोबिक्सची मदत होते, असे म्हटले होते. हे संशोधन ४० ते ६२ वयातील आणि मासिकपाळी बंद झालेल्या स्त्रियांवर करण्यात आले. संशोधनात सहभागी झालेल्या महिलांना १२ आठवडे योगा आणि अ‍ॅरोबिक व्यायाम देण्यात आले. त्यानंतर त्या महिलांच्या झोपेची वेळ आणि जागे होण्याची वेळ याचा अभ्यास करण्यात आला. या महिलांवरील संशोधनानंतर सात तास किंवा त्यापेक्षा अधिक झोपेची या महिलांना गरज असल्याचे या महिलांनी सांगितले.