23 November 2020

News Flash

व्हिडिओमध्ये जाहिरात दाखवणार Youtube, पण क्रिएटर्सना नाही मिळणार पैसे

यूट्यूब व्हिडिओ क्रिएटर्ससाठी बॅड न्यूज...

(संग्रहित छायाचित्र)

लोकप्रिय व्हिडिओ शेअरींग प्लॅटफॉर्म यूट्यूबबाबतची सर्वाच चांगली गोष्ट म्हणजे यावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या क्रिएटर्सना पैसे मिळतात. यूट्यूबकडून ज्या क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिरात दाखवली जाते त्यांनाही जाहिरातीतून मिळणाऱ्या रिव्हेन्यूचा हिस्सा मिळतो. पण, आता यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये एक मोठा बदल झाला असून अनेक क्रिएटर्सच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवल्यानंतरही त्यांना पैसे मिळणार नाहीत. यूट्यूब व्हिडिओ क्रिएटर्ससाठी ही ‘बॅड न्यूज’ ठरु शकते.

The Verge च्या एका रिपोर्टनुसार, नवीन मॉनिटाइजेशन नियमांनुसार, जर क्रिएटर यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्रामचा भाग नसेल तरीही त्याच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवता येतील. यूट्यूबकडून प्लॅटफॉर्मच्या अटी (टर्म्स ऑफ सर्व्हिसेस) अपडेट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही यूट्यूब व्हिडिओवर जाहिराती दिसायच्या आणि त्या बदल्यात क्रिएटरला पैसे दिले जात होते. पण आता असं होणार नाही. म्हणजे एखाद्या व्हिडिओवर आता जाहिरात दिसली तरी त्याचे पैसे क्रिएटरला मिळतीलच असं नाही.

या क्रिएटर्सवर होणार परिणाम :-
नवीन अपडेटचा फटका अनेक छोट्या क्रिएटर्सना बसू शकतो. यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग बनण्यासाठी एखाद्या क्रिएटरचे किमान 1000 सबस्क्राइबर्स असायला हवेत, तसेच 12 महिन्यांच्या आत 4000 तासांचा वॉचटाइम त्यांच्या व्हिडिओला असणं गरजेचं आहे. कंपनीने नवीन ‘टर्म्स ऑफ सर्व्हिसेस’ अमेरिकेत रोलआउट केले आहेत, पण जगभरातील अन्य मार्केट्समध्येही पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत या अटी लागू होतील. टप्प्याटप्प्याने आम्ही YPP अर्थात यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग नसलेल्या चॅनल्सच्या व्हिडिओंवरही जाहिराती दाखवू, म्हणजे तुम्ही YPP चा हिस्सा नसाल तरीही तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती दिसू शकतात, असं युट्यूबकडून सांगण्यात आलं आहे. यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा भाग नसल्यामुळे जोपर्यंत क्रिएटर्स आपलं चॅनल मॉनिटाइज करत नाही तोपर्यंत त्यांना रिव्हेन्यू मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 11:31 am

Web Title: youtube willl run ads on some creator videos but wont pay them sas 89
Next Stories
1 SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिला अलर्ट, जाणून घ्या डिटेल्स
2 6,000mAh बॅटरी + 64MP कॅमेरा असलेल्या Poco X3 साठी आलं नवं अपडेट, युजर्सना मिळालं नवीन फिचर
3 आम्लपित्ताच्या त्रासापासून दातदुखीपर्यंत पेरु खाण्याचे ७ फायदे
Just Now!
X