Weight Loss Story : सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. चुकीच्या सवयींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे वजन वाढीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी काही लोक वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण अनेकदा ते अपयशी ठरतात. एका व्यक्तीने पाच महिन्यात ४८ किलो वजन कमी केले आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरं आहे. आज आपण त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
सार्थक अनेजा असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ वर्षीय सार्थक नोएडा येथे राहतो. सार्थकचे पाच महिन्यांपूर्वी १३३ किलो वजन होते. खूप जास्त वजन असल्याने त्याला वारंवार थकवा जाणवत असे. त्याचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते. वजन जास्त असल्याने कपडेसुद्धा खूप फिट व्हायचे. नवीन कपडे घेणे त्याच्यासाठी एक खूप मोठं आव्हान असायचं. एकदा तो वाढदिवसाच्या एका पार्टीला गेला आणि तेथील फोटो पाहून त्याने वजन कमी करायचं ठरवलं.
सार्थकने वजन कमी कसे केले?
सार्थकने इंटरमिटेंट फास्टिंग सुरू केली. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे लोक खाताना ठराविक काळाचा मोठा ब्रेक घेतात. सायंकाळी सात नंतर तो काहीही खायचा नाही. त्याने डाएटमध्ये प्रोटीन्सचे पदार्थ घेणे सुरू केले. जे पदार्थ आवडायचे त्यावर आवर घातला. खाण्याचे प्रमाण कमी केले. तो एक तास कार्डिओ करायचा आणि एक तास वेट ट्रेनिंग करायचा. याशिवाय वीकेंडला तो बॅडमिंटन किंवा क्रिकेट खेळायचा.
हेही वाचा : Video : तेलात पदार्थ तळताना कोणती काळजी घ्यावी? सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिल्या खास टिप्स….
डाएट प्लॅन
नाश्ता – आवळा, ॲलोव्हेरा ज्यूस, ४ बदाम, ४ मनुके, २ अक्रोड, १ स्कूप प्रोटिन शेक.
दुपारचे जेवण – ताक किंवा टरबूजचा ज्यूस, चिकन सॅलेड.
रात्रीचे जेवण – ऑम्लेट किंवा उकडलेली अंडी (सायंकाळी सातच्या पूर्वी)
फिटनेस सिक्रेट : इंटरमिटेंट फास्टिंग आणि रिकाम्या पोटी व्यायाम करणे.
सार्थक आजसुद्धा त्याचे जुने फोटो पुन्हा पुन्हा बघतो. तो म्हणतो की, त्याला जुने फोटो पाहून प्रेरणा मिळते. आता तो सर्व प्रकारचे कपडे घालतो. त्याच्याकडे आता अनेक फॅशनेबल कपडे आहेत.
सार्थकच्या मते कोणत्याही कामात सातत्यपणा असणे गरजेचे आहे. जर सातत्यपणा असेल तर तुम्ही सहज वजन कमी करू शकता.