2019 Land Rover Discovery भारतात लाँच झाली आहे. ‘जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया’ने भारतात ‘2019 लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी’च्‍या 2.0 लिटर डिझेल व्हेरिअंटची घोषणा केली. 75.18 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी या कारची किंमत आहे. एस, एसई, एचएसई व एचएसई लक्‍झरी ट्रिममध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या नवीन व्हेरिअंटमध्ये 2.0 लिटर उच्‍च शक्‍तीच्‍या डिझेल इग्‍नेनिअम इंजिनाची शक्‍ती आहे. हे इंजिन 177 केडब्‍ल्‍यूचे पॉवर आऊटपुट आणि 500 एनएमच्या सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. हे प्रगत इंजिन म्हणजे सर्वोत्‍तम राइडिंग अनुभव देण्‍यासाठी उत्‍तम टर्बो तंत्रज्ञान असलेले पहिले जॅग्‍वार लँड रोव्‍हर पॉवरप्‍लाण्‍ट आहे.

डिस्‍कव्‍हरी एकसंधपणे एका लक्षवेधक पॅकेजमध्‍ये तंत्रज्ञान व क्षमतांना समाविष्‍ट करते. सर्वोत्‍कृष्‍ट अॅप्रोच अँगल (340), रॅम्‍प अँगल (27.50) आणि डिपार्चर अँगल (300), 900 मिमीची वॉटर वेडिंग डेप्‍थ क्षमता आणि 3500 किलो टोइंग क्षमतेसह डिस्‍कव्‍हरीमध्‍ये कधीच न थांबणाऱ्या साहसाचा उत्‍साह सामावलेला आहे. ‘डिस्‍कव्‍हर करणे कधीच थांबवू नका’ या लँड रोव्‍हरच्‍या तत्‍त्‍वाशी बांधील असलेल्‍या डिस्‍कव्‍हरीमध्‍ये सुरेखरित्‍या तयार केलेले पूर्ण-आकाराचे सात आसनी इंटेरिअर, सर्वोत्‍तम डिझाइनसह ड्रॅमॅटिक रूपरेखा, आधुनिकता आणि डायनॅमिक सिल्‍हूटची वैशिष्‍ट्ये आहेत. 2019साठी डिस्‍कव्‍हरी 2.0 लिटर डिझेल व्‍हेरिअंटमध्‍ये सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे. यामध्ये इलेक्‍ट्रीकली रिक्‍लाइनिंग सीट्स, इंटेलिजंट सीट फोल्‍ड, फोर-झोन क्‍लायमेट कंट्रोल, पॉवर्ड थर्ड रो सीट्स, पॅनोरॅमिक सनरुफ, केबिन एअर आयोनायझेशन, 360 अंश सराऊंड कॅमेरा, अॅडॅप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल, प्रोटेक्‍ट, रिमोट अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.