यामाहा मोटर इंडियाने भारतात आपली 2019 MT-09 बाइक लाँच केली आहे. देशभरातील यामाहा डिलर्सकडे या नव्या बाइकसाठी बुकिंग सुरू झाली आहे. 10.55 लाख रुपये इतकी या बाइकची किंमत ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिसायला ही बाइक जवळफास जुन्या बाइकप्रमाणेच आहे. यामध्ये अॅग्रेसिव्ह स्टायलिंग, ट्विन-LED हेडलॅम्प्स, फ्युअल टँकच्या दोन्ही बाजूला एअर-इंटेक्स, मिनिमलिस्टिक रिअर-एंड आणि सिंगल पीस सीट देण्यात आलंय.

मॅकेनिकल स्पेसिफिकेशन्स –
यामध्ये 847cc लिक्विड-कू्ल्ड थ्री-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 115bhp ची पावर आणि 87Nm पिक टॉर्क जनरेट करतं. ट्रांसमिशनसाठी यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आङे. ब्रेकिंगसाठी बाइकच्या पुढील बाजूला 298mm ड्युअल डिस्क आणि रिअरमध्ये 245mm सिंगल डिस्क ब्रेक आहे. या बाइकचं वजन 193 किलोग्राम असून पेट्रोल टाकीत 14 लिटर पेट्रोल भरता येऊ शकतं. याशिवाय 135mm इतका या बाइकचा ग्राइंड क्लिअरंस आहे. या बाइकमध्ये क्विक शिफ्टर, A&S क्लच, थ्री-राइडिंग मोड्स, अॅडजस्टेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्टँडर्ड प्रकारातील एक स्विचेबल ABS देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2019 yamaha mt 09 launched in india
First published on: 21-02-2019 at 15:16 IST