परदेशात जाताना सर्व पैसा रोख नेण्याची गरज नसते. तसे करणे धोक्याचे आणि अडचणीचे ठरु शकते, तसेच परदेशी चलन घेतानासुद्धा बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने अनेकजण क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय स्विकारतात. अशावेळी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड तुमच्या मदतीस धावून येते. परदेशात पैशाचे व्यवहार करण्यासाठी हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. या कार्डांवर तुम्हाला डिस्काउंट, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सुद्धा मिळू शकतात. रोख पैसे नेण्यापेक्षा हा मार्ग अधिक सुरक्षित आहे. जर हे क्रेडिट कार्ड प्रवासात हरवले, तर तुम्ही लगेच क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून त्या कार्डला ब्लॉक करू शकता. रोख व्यवहार संपूर्णपणे टाळणे जरी कठीण असले, तरी क्रेडिट कार्डामुळे तुमचा एकूण प्रवास अधिक सोपा केला जाऊ शकतो. याचा योग्य पद्धतीने फायदा घेण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष ठेवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशात वापरण्यासाठी तुमचे कार्ड ग्राह्य आहे किंवा नाही याची खात्री करा

सध्याची बहुतांश क्रेडिट कार्डे जगभरात वापरता येण्यासारखी आहेत, तरीही तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीकडून तुम्ही जात असलेल्या देशांत ते चालणार नसेल तर त्याची शहनिशा करून घ्या. परदेशात असताना तुम्हाला त्रास व्हायला नको. निरनिराळ्या एजन्सीचे एकाहून जास्त क्रेडिट कार्ड बाळगा. म्हणजेच एखाद्या ठिकाणी एक कार्ड चालले नाही, तर तुम्ही दुसरे कार्ड वापरू शकता. कार्ड निवडताना, आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील लाउंजमध्ये विनामूल्य प्रवेश आहे किंवा नाही, किती वेळा असा प्रवेश मिळू शकतो आणि विनामूल्य प्रवेशांची संख्या संपल्यावर किती फी आकारली जाईल या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवा.

तुमच्या प्रवासाबद्दल क्रेडिट कार्ड कंपनीला कळवा

प्रवास सुरू करण्याआधी क्रेडिट कार्ड कंपनीला तुमच्या प्रवासाची कल्पना द्या. अशाने तुम्हाला अबाधित सेवा मिळू शकेल. तुमच्या क्रेडिट कार्डवर नेहेमीपेक्षा निराळा व्यवहार झाल्यावर कंपनी तुम्हाला विचारण्यासाठी कॉल करेल आणि जर तुमच्याशी ते फोनवर बोलू शकले नाहीत तर कंपनी ते कार्ड लगेच ब्लॉक करू शकते. तुमच्या कार्ड कंपनीला तुमच्या प्रवासाबद्दल माहिती नसल्यास परदेशात त्या कार्डावर व्यवहार झाल्यावर त्यांना तो व्यवहार नेहेमीपेक्षा निराळा वाटू शकतो. म्हणूनच, तुमच्या क्रेडिट कार्ड कंपनीला तुमचा प्रवास सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख कळवा.

आपली खर्चाची मर्यादा तपासा

निघण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डावरील मर्यादा सुद्धा पाहून घेतली पाहिजे. परदेशातील व्यवहारांमुळे ही मर्यादा लवकर गाठली जाण्याची शक्यता असल्यास तुम्ही ती वाढवून घेऊ शकता. क्रेडिट कार्डावरील मर्यादा गाठलेली असल्यास तुमचे व्यवहार नाकारले जाऊ शकतात आणि तुम्ही आर्थिक अडचणीत सापडू शकता. यासाठी सुद्धा एकाहून जास्त कार्डे असलेली बरी.

फसवेगिरीपासून सावध राहा

क्रेडिट कार्डाची क्लोनिंग, माहितीची चोरी, अधिक पैशाचा व्यवहार होणे इत्यादी फसवणुकीचे प्रकार काही देशांमध्ये सर्रास चालतात त्यामुळे परदेश प्रवासात क्रेडिट कार्ड जपूनच वापरा. कार्डाचा वापर फक्त प्रतिष्ठित दुकानांमधून किंवा एटीएमवरच करा. एटीएम संबंधी फसणुकींपासून सुद्धा सावध राहा. एखादे बिल देताना कार्ड तुमच्या नजरेआड होता कामा नये. ऑनलाइन व्यवहार करताना सार्वजनिक कॉम्प्युटर वापरू नका. जर अशा कॉम्प्युटरचा वापर टाळता येत नसला, तर क्रेडिट कार्डाचा तपशील टाकताना स्क्रीनवरील व्हर्चुअल कीबोर्ड वापरा.

कार्ड-सुरक्षा प्लॅन घ्या

क्रेडिट कार्ड कंपनीकडून कार्ड सुरक्षा प्लॅन (कार्ड प्रोटेक्शन प्लॅन किंवा सीपीपी) घेतल्याने तुम्ही तुमच्या कार्डाची सुरक्षा अवैध व्यवहार, कार्ड हरवणे, कार्ड चोरीला जाणे इत्यादी घटनांपासून सुरक्षा करू शकता. सीपीपी द्वारे तुम्ही अशा अनेक जोखमींपासून आपल्या कार्डांची, तसेच इतर महत्वाच्या दस्तऐवजांची सुरक्षा करू शकता. परदेश प्रवासात कार्ड हरवल्यावर सुरक्षा प्लॅनमधील रकमेएवढी मदत तुम्हाला सीपीपी द्वारे हॉटेल आणि प्रवास खर्च भागवण्यासाठी होईल. फसवणूक-सुरक्षेच्या अंतर्गत कव्हर केल्या जाणाऱ्या जोखमी आहेत स्किमिंग, फिशिंग आणि बनावट कार्ड तयार करणे, तसेच ऑनलाइन आणि पिन-आधारित फसवणुकी सुद्धा कव्हर केल्या जातात.

परदेश प्रवासाच्यावेळी परदेशात कार्ड वापरल्यावर आकारली जाणारी फी सुद्धा तुम्ही पाहायला हवी. सर्व व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डावर अवलंबून राहू नका. खरेदीसाठी अनेक पर्याय वापरा, जसे रोख, ट्रॅव्हलर्स कार्ड, डेबिट कार्ड आणि ट्रॅव्हलर्स चेक.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 things to keep in mind about using credit cards while going on an international trip
First published on: 25-05-2018 at 14:47 IST