Saree Pallu Hack in 1 Minute: दिवाळी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही दिवाळीची खरेदी केली असेलच हो ना? धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी काय व कसा फॅन्सी लुक करायचा हे तुम्हीही ठरवलं असेल. आता अगदी पैठणीपासून ते कॉटनपर्यंत विविध फॅब्रिकमध्ये फॅन्सी इंडो- वेस्टर्न लुकचे अनेक पर्याय असल्याने रोज वेगळा लुक करणं सुद्धा सहज शक्य असतं. कितीही वैविध्य केलं तरी दिवाळीच्या एखाद्या दिवशी तरी छान पारंपरिक साडी नेसून, नथ, दागिने, आंबाडा, गजरा असा लुक सुद्धा अनेकींना करायचाच असतो.

दिवाळीची साडी म्हणजे जरा नेहमीच्या साड्यांपेक्षा जड असते. काही वेळेला जरीच्या, छान मण्यांच्या, गोंड्यांच्या, या साड्या दिसायला जरी अप्रतिम दिसत असल्या तरी नेसताना अनेकदा नाकी नऊ येतात. साडीचा पदर लावताना येणारी अडचण ही तर वेगळी सांगायलाच नको. पण आज आपण अशी एक जुगाडू हॅक बघणार आहोत जी तुम्हाला अवघ्या ६० सेकंदात परफेक्ट पदर लावण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते. त्यामुळे कितीही फुलणारी साडी असली तरी अगदी चापून चोपून ती नेसता येऊ शकते. चला तर मग पाहूया हा जुगाड

इन्स्टाग्रामवर @mishra_rekha_या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

  • साडी नेसून झाल्यावर जेव्हा तुम्ही पदर लावायला घेता तेव्हा त्याच्या घड्या करताना आधी तुम्हाला पदर हवा तितका लांब सोडून मग आडव्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे.
  • मग या अर्ध्या केलेल्या पदराच्या हव्या तितक्या लहान किंवा मोठ्या घड्या घालून घ्या.
  • अर्ध्यावरच त्याला पिन लावून घ्या.
  • पदर उलट बाजूने फिरवून खांद्यावर लावून घ्या.

Saree Poses Guide: दिवाळीत फक्त ‘तेरा ही जलवा’! साडी मध्ये ‘सेलिब्रिटी पोझ’ कशी द्यायची पाहून ठेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओमध्ये दाखवलेली ट्रिक वापरून पाहिलेल्या काही फॉलोवर्सनी कमेंट्स मध्ये याच जुगाडू हॅकचं कौतुक केलं आहे. तुम्ही सुद्धा दिवाळीआधी एकदा हा प्रयोग नक्की करून पाहा आणि तुमचा कसा लुक होतोय हे नक्की कळवा.