१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा केला जातो. कारण याच दिवशी भारतात ब्रिटीश राजवटीचा अंत झाला होता. ब्रिटीशांनी जवळजवळ आपल्या भारतावर २०० वर्ष राज्य केलं होतं. आपला भारत देश स्वातंत्र व्हावा याकरिता अनेक महान हुतात्म्यांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण द्यावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकांना सार्वजनिक सुट्टी असते. स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण आपल्या आसपासच्या शाळेत किंवा स्वातंत्र्यदिनाच्या समारंभस्थळी परेड पाहण्यासाठी बाहेर जात असतात. काहीजण आपल्या कुटुंबासोबत, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. परंतु गेल्या दोन वर्षापासून करोना साथीच्या रोगाने संपूर्ण देशभर तसेच जगात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपली काळजी घेण्यासाठी व करोनापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले. यामुळे अनेकांना बाहेर जाऊन हा दिवस साजरा करण्याची तसेच परेड पाहण्यासाची परवानगी देण्यात आली नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75th independence day how to celebrate 15th august at home during covid lockdown scsm
First published on: 14-08-2021 at 20:10 IST