दिवसभर धावपळ करूनही रात्री अनेकांना पटकन झोप लागत नाही. व्यग्र वेळापत्रकामुळे झालेली दमछाक किंवा मानसिक आरोग्यावर असलेला तणाव कदाचित तुम्हाला पहाटेपर्यंत जागं ठेवत असेल. खरा प्रश्न असा आहे, की निरर्थक गोष्टींमधे जाणारा वेळ कमी करून शांत झोप कशी मिळवायची. झोपेची वेळ निश्चित असणे आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असते. पण ते करुनही तुम्हाला नीट झोप येत नसेल तर आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
काही खाद्यपदार्थांमध्ये पटकन झोप लागण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. तुमच्या रोजच्या जेवणात त्यांचा समावेश केल्यानं शरीराला आवश्यक तितकी झोप मिळू शकेल. स्लीप @ १० उपक्रमांतर्गत याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात येत असून तुम्हाला छान झोप लागण्यासाठी मदत करतील असे सर्वोत्तम खाद्यपदार्थ पुढीलप्रमाणे…
बदाम – बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं, जे शांत झोप लागण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. असं म्हणतात, की मॅग्नेशियमची शरीरातील पातळी खालावल्यास झोप लागण्यात अडचणी येतात. रोज बदाम खाल्ल्यानं मॅग्नेशियमची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते आणि छान झोप येते.
कॉटेज चीज – भरपूर प्रमाणात आरोग्यदायी प्रथिनं असलेल्या कॉटेज चीजमध्ये अमिनो असिड ट्रायप्टोफान असतात, ज्यातून सेरोटोनिन पातळी वाढते. सेरोटोनिन हे मानवी शरीरासाठी आवश्यक हार्मोन आहे, ज्याच्या अभावामुळे एकाग्रता कमी होते आणि निद्रानाशासारखे आजार जडू शकतात. म्हणून शरीरातील सेरोटोनिनची पातळी समतोल राखण्यासाठी कॉटेज चीज खाणे आवश्यक आहे.
अक्रोड – अक्रोडामध्ये अमिनो असिड ट्रायप्टोफान हा झोप सुधारण्यासाठी मदत करणारा घटक मोठ्या प्रमाणावर असतो. या घटकामुळे शरीराचे वेळापत्रक, झोप लागण्याचे व उठण्याचे वेळापत्रक व्यवस्थित राखणाऱ्या मेलाटोनिन व सेरोटोनिनची पातळी योग्य राहाते. टेक्सास विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार अक्रोडामध्ये असलेल्या मेलाटोनिनमुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
मध – मधात असलेल्या ग्लुकोजमुळे मेंदूला निद्रानाश, उत्तेजना आणि भूक इत्यादी संदेश देणारे ओरेक्सिन बंद करण्याचा संदेश मिळतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
लेट्युस – लेट्युसमध्ये लॅक्टेकॅरियम नावाचे गुंगी आणणारे घटक असतात. त्यामुळे लेट्युसचा सॅलडमध्ये समावेश करण्याऐवजी त्याची चार- पाच पाने पाण्यात किमान १५ मिनिटे उकळवावीत. त्यात दोन पुदिन्याच्या पानांच्या काड्या घालून ती दोन मिनिटांनी बाहेर काढावीत. हे पेय रात्री झोपण्यापूर्वी प्यावं.
भात – आतापर्यंत तुम्ही तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी कसा चांगला नाही हे ऐकलं असेल. पण त्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते हे तुम्हाला माहीत आहे का? याचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्यामुळे झोप लागण्यासाठी जाणारा वेळ कमी होतो. वैद्यकीय पोषणतत्वांबाबत अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जास्मिन तांदळापासून बनवलेला भात खाणाऱ्या लोकांना इतरांच्या तुलनेत लवकर झोप लागते.
कडधान्ये– सकाळी कडधान्ये खाण्यापेक्षा झोपण्याआधी खा. नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार, वाटीभर आवडती कडधान्ये खाल्ल्याने त्यातील दोन घटकांचा जादूई परिणाम होतो. कडधान्मियातून ळणारे कार्बोहायड्रेट्स आणि दुधातून मिळणारं कॅल्शियम अतिशय उपयुक्त असतं.
तेव्हा झोप लागत नसेल किंवा रात्रीतून बऱ्याचदा जाग येत असेल, तर हे खाद्यपदार्थ घरात असतील याची काळजी घ्या.