दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या Reliance Jio, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्यांनी दरवाढ केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांची टॅरिफ दरवाढ तीन डिसेंबरपासून लागू झाल्यानंतर आजपासून (दि.६) रिलायंस जिओचीही दरवाढ लागू होत आहेत. आजपासून जिओचे नवे प्लॅन लागू होणार आहेत. जाणून घेऊया जिओचे सर्व प्लॅन्स –
28 दिवस वैधता :
129 रुपये – एकूण 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे ,जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंग मोफत.
199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत.
249 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अॅपचं सब्स्क्रिप्शन मोफत.
349 रुपये- दररोज 3 जीबी डेटा, अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
आणखी वाचा- Airtel आणि Vodafone ग्राहकांना झटका, दोन लोकप्रिय प्लॅन बंद; नवा पर्याय कोणता ?
56 दिवस वैधता :
399 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
444 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत
84 दिवस वैधता :
555 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
599 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत.
365 दिवस वैधता :
2,199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिटे आणि जिओ अॅप सब्स्क्रिप्शन मोफत.