भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी असलेल्या भारती एअरटेल (Bharti Airtel) आता आपल्या युझर्सना फक्त ५ रुपयांमध्ये १ जीबी डेटा देणार आहे. विशेष म्हणजे आपली ही डील अधिक खास बनवण्यासाठी भारती एअरटेल त्याच्यासोबत OTT लाभ देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओशी (Reliance Jio)स्पर्धा करण्यासाठी एअरटेलने ही नवीन ऑफर आणत आपल्या युझर्सना खुश करण्याचा हा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर एअरटेलच्या डेटा प्लॅन्सची किंमत इतर कंपन्यांपेक्षा थोडी जास्त असते. परंतु नेटवर्कच्या गुणवत्तेमुळे युझर्स एअरटेलकडेच जाऊ शकतात, असं म्हटलं जात. त्यातच एअरटेल आता ही एक नवी प्लॅन ऑफर देत आहे. या नव्या ऑफरमार्फत म्हटल्याप्रमाणे युझर्सना फक्त ५ रुपयांमध्ये १ जीबी डेटा मिळणार आहेच. पण या व्यतिरिक्त एअरटेलच्या ह्या ऑफरमध्ये युझर्सना डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप देखील दिली जाणार आहे.

Airtel च्या नव्या डेटा प्लॅनची एकूण किंमत आणि डेटा किती?

आपण जर एअरटेलच्या या प्लॅनमधील प्रति जीबी डेटाबद्दल बोललो तर हा प्लॅन युझर्सना एकूण ८४ जीबी देतो. तर या प्लॅनची किंमत ४४८ रुपये इतकी आहे. याचाच अर्थ युझर्सना प्रति जीबी डेटामागे फक्त ५.३ रुपये इतका खर्च करावा लागेल. तर या प्लॅनमध्ये युझर्सना दररोज ३ जीबी डेटा दिला मिळेल. या व्यतिरिक्त, हा प्लॅन अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस हे फायदे देखील मिळतील. दरम्यान, या प्लॅनची वैधता ही २८ दिवसांची आहे.

जे आधीपासूनच एअरटेलचे ग्राहक आहेत आणि ज्यांना अधिक डेटा असलेला प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हा नवा उत्तम असेल. याचसोबत आता एअरटेल ५ जी च्या दिशेने देखील वाटचाल करत आहे. यासाठी ती ५ जीबाबत चाचणी करत आहे. त्यामुळे याबाबत देखील उत्सुकता आहेच.

मे २०२१ मध्ये Airtel ने गमावले होते ४३ लाखांपेक्षा जास्त युझर्स

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी रिलायन्स जिओचे मे २०२१ मध्ये आणखी तब्बल ३५.५ लाख युझर्स जोडले गेले. तर याच कालावधीत प्रतिस्पर्धी असलेल्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या घटली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मे महिन्याचा स्बस्क्रायबर डेटा जारी केला. या डेटानुसार, भारती एअरटेलने या काळात आपले तब्बल ४३.१६ लाख युझर्स गमावल्याची माहिती समोर आली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel offering 1 gb data for rupees 5 only and much more this plan gst
First published on: 03-08-2021 at 15:52 IST