अल्कोहोल हृदयासाठी चांगले असू शकते, जेव्हा त्याचे सेवन नियंत्रितपणे असते असे म्हटले जाते. पण नवसंशोधनातून कधी तरी किंवा कधीही मद्यसेवन न केलेल्यांपेक्षा सतत व नियंत्रणात वाइन, दारू किंवा बीअरचे सेवन करणाऱ्यांमध्ये हृदयघात किंवा हृदयविकार होण्याची शक्यता कमी असल्याचे सिद्ध झाले आहे.
आठवडय़ातून तीन ते पाचवेळा मद्यसेवन हे हृदयासाठी चांगले असल्याचे नॉरवेजिअनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (एनटीएनयू) विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.
हा दावा दोन शक्यतांना पडताळताना करण्यात आला आहे, ज्यानुसार हृदयघात आणि हृदय स्नायूमध्ये रक्ताच्या गुठळ्या (एएमआय) तयार होण्यामागे नियमित मद्यसेवन करणाऱ्यांचे हृदय व रक्तवाहिन्या या अल्प व कधीही अल्कोहोलचे सेवन न करणाऱ्यांपेक्षा खूपच सुदृढ असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांच्या मते, दर आठवडय़ाला तीन ते पाचवेळा मद्यसेवन करणाऱ्यांमध्ये हृदयघात होण्याचे प्रमाण केवळ ३३ टक्के असून हे प्रमाण कधीही किंवा केव्हा तरी मद्यसेवन करणाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे. तर एका अतिरिक्त मद्यसेवनामुळे हृदयघाताची शक्यता ही केवळ २८ टक्के एवढीच असते.
दोन्ही संशोधने ११९५ आणि १९९७ दरम्यान देशांतरीय शोध-२ या नॉर्ड-त्रोंदेलाग आरोग्य अभ्यासांतर्गत करण्यात आली आहेत. या वेळी हृदयघात आलेल्या ६० हजार ६६५ लोकांचे हृदय आणि अल्कोहोल यांच्यातील संबंधाचे विश्लेषण या अभ्यासात केले गेले आहे. त्यापैकी १५८८ जणांना अभ्यासादरम्यानच हृदयघाताची लक्षणे दिसून आली, तर त्यांची समाप्ती २००८ मध्ये झाली.
हृदयघात झालेल्या ५८ हजार ८२७ लोकांची मद्यसेवन करत असलेल्या आणि कधी तरी सेवन करणाऱ्या अशा दोन गटांत वर्गवारी करण्यात आली. त्यापैकी २ हजार ९६६ जणांना ११९५ आणि २००८ दरम्यान ‘एएमआय’ची लक्षणे दिसून आली, तर मद्यसेवनाच्या अतिरिक्त सेवनामुळे ‘एएमआय’ची शक्यता केवळ २८ टक्क्यांवर येत असल्याचे दिसून आले.
हे संशोधन ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ कार्डिओलॉजी’ आणि ‘इंटरनल मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcohol intake beneficial to health
First published on: 09-03-2016 at 01:55 IST