ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो. कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही. कोरफड सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक आहे. या आश्चर्यकारक यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी आरोग्यदायी मानले जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी मोठया प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये कोरफडीचा समावेश होतो. ही एक औषधी वनस्पती आहे. ज्यामध्ये ९६ टक्के पाणी असते. कोरफडीमध्ये ए,बी, सी आणि ई व्हिटॅमिनसह अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. ते रोज लावल्यास त्वचा निरोगी राहते. तुम्ही कोरफड रात्रीच्या वेळेस चेहऱ्यावर देखील लावू शकता. कोरफड तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कशाप्रकारे लावू शकता आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात.

कोरफड चेहऱ्यावर कशाप्रकारे लावावी?

कोरफडसह गर चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे होतात. जर का तुम्ही कोरफडीच्या ताज्या पानांचा गर काढून चेहऱ्यावर लावू शकता किंवा बाजारातून कोरफडीचे जेल विकत घेऊन देखील चेहऱ्यावर लावू शकता. कोरफडीचा गर आपण कोणत्या गोष्टींसह चेहऱ्यांवर लावू शकता हे पाहुयात.

हेही वाचा : Health Tips: रोज सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

कोरफड आणि हळद

प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी राहावी आणि छान दिसावी असे वाटत असते. तसेच आपला चेहरा देखील चांगला राहावा असे वाटत असते. यासाठी आपण अनेक उपाय करतो. मात्र जशी कोरफड चेहऱ्यासाठी चांगली आहे तशी हळद देखील चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे. होळीमध्ये असलेले औषधी गुणधर्म त्वचेला अनेक फायदे देतात. तळहातावर कोरफड घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करावी. त्यानंतर हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावे. तुम्ही रात्रभर हे मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवू शकता. तसेच १० ते १५ मिनिटानंतर चेहरा धुवू देखील शकता.

कोरफड आणि गुलाबपाणी

अनेकवेळा लोकं रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावतात. मात्र त्याचा अधिक चांगला परिणाम होण्यासाठी त्यात तुम्ही कोरफड मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. तळहातावर कोरफडीचे जेल घेऊन त्यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिसळावेत. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. तसेच चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.

हेही वाचा : Diabetes And Travel : मधुमेहींनी प्रवासात कशी घ्यावी स्वत:ची काळजी, जाणून घ्या सोप्या टिप्स

कोरफड मास्क

कोरफड मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये कोरफडीचे जेल घ्यावे. जेवढे जेल घेतले आहे तेवढ्याच प्रमाणात मध मिसळावे. तुम्हाला हवे असल्यास यात तुम्ही या मिश्रणामध्ये काकडीचा रसही मिसळू शकता. त्याची पेस्ट तयार करून २० मिनिटे चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)