सध्याच्या धावत्या जीवनशैलीत ‘स्मार्टवॉच’ हे अतिशय उपयुक्त उपकरण ठरत आहे. भारतीय बाजारात गेल्या दोनेक वर्षांत स्मार्टवॉचचा ग्राहकवर्ग तयार होऊ लागला आहे. आरोग्यविषयक तपशील मिळण्याच्या फायद्याखेरीज इतर अनेक वैशिष्टय़ांमुळे ‘वेअरेबल डिव्हाइसेस’च्या गटात ‘स्मार्टवॉच’ला सध्या जास्त मागणी आहे. त्यामुळेच Huami कंपनीने भारतात रेट्रो स्टाइल स्मार्ट वॉच Amazfit Neo लाँच केली आहे. या स्मार्टवॉचची किंमत फक्त २, ४९९ रुपये इतकी आहे. २८ दिवसांपर्यंत या स्मार्टवॉचची बॅटरी बॅकअप असेल असा दावा कंपनीने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Amazfit Neo या स्मार्टवॉचमध्ये मोनोक्रोम ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये फिजिकल बटन्सही देण्यात आलं आहे जे नेव्हिगेशनसाठी वापरण्यात येऊ शकते. हे स्मार्ट वॉच 5ATM पर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे. या स्मार्टवॉचमध्ये पेडोमीटर, हार्टरेट मॉनिटर, सेडनटरी रिमाइंडर, स्लीप मॉनिटर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. पेडोमीटरद्वारे तुम्ही दिवसभरात किती पावले चालला, याचा तपशील नोंदवला जातो. ‘हार्टरेट मॉनिटर’ हा या स्मार्टवॉचचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ‘हार्टरेट मॉनिटर’मुळे तुमच्या ह्रदयचे ठोके मोजण्यात येतात. या स्मार्टवॉचमध्ये पर्सनल ऐक्टिविटी इंटेलिजेंस हे फिचरही देण्यात आलं आहे.

एक ऑक्टोबरपासून Amazfit Neo या स्मार्टवॉचची विक्री भारतात सुरु होणार आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, पेटीएम, टाटा क्लीकसह Amazfit संकेतस्थळावरुन हे स्मार्ट वॉच खरेदी करु शकता. ब्लॅक, ग्रीन आणि रेड अशा चार रंगामध्ये Amazfit Neo हे स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये डीप सलीम मॉनिटर, लाइट स्लीप मॉनिटरसारखे फिचर देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचचं खास वैशिष्ट म्हणजे यामध्ये तीन स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यामध्ये वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. या स्मार्टवॉचा डिस्प्ले १.२ इंचाचा मोनोक्रोम डिस्प्ले आहे.

Amazfit Neo स्मार्टवॉचला Bluetooth 5.0 कनेक्टिविटी दिली आहे. यामुळे तुम्ही आयफोन किंवा स्मार्टाफोनला कनेक्ट करु शकता. या स्मार्टवॉचच्या उजवीकडे पारंपरिक घडय़ाळात असते त्यासारखी छोटी कळ आहे. ही कळ अर्थात बटण ‘मल्टिफंक्शनल’ असून त्याद्वारे स्मार्टवॉच चालू-बंद करणे, लॉक-अनलॉक करणे आदी गोष्टी करता येतात. वॉचच्या मागच्या बाजूस स्पीकर, चार्जिग पॉइंट आणि ‘हार्टबिट’ मोजण्यासाठीचा सेन्सर पुरवण्यात आला आहे. या गोष्टी वगळता स्मार्टवॉचवर अन्य कोणत्याही गोष्टी नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazfit neo first impressions the smartwatch deserves the retro tag nck
First published on: 01-10-2020 at 08:37 IST