उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. अशावेळी कलिंगड, खरबूज ही फळं मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागतात. उन्हाळ्यात ही फळं खाणं म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेले एकप्रकारेच वरदानच आहे. रसदार, चवदार आणि थंड असणारं हे फळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत बाजारात उपलब्ध असतं. मूळचे आफ्रिकेतले असणारे हे फळ आता भारतातसुद्धा उष्ण हवामानाच्या प्रदेशात विपुल प्रमाणात पिकते.
खरबूज कसा निवडावा?
-खरबूज घेताना तो कच्चा घेऊ नये. तसेच तो अति प्रमाणात पिकलेलाही घेऊ नये.
– खरबूज घेताना तो किंचितसहा बोटांनी दाबून पाहावा, जास्त दबलेला खरबूज कधीही खाऊ नये. कारण यामुळे उन्हाळ्यामध्ये जंतुसंसर्गाची बाधा होऊ शकते.
– कलिंगड असो किंवा खरबूज ही फळं कधीही फ्रिजमध्ये जास्त काळ कापून ठेवू नयेत. त्यांचे लगेच सेवन करावं.

वाचा : उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे हे आहेत फायदे

खरबूज कधी खावे?
खरबूज हे फळ सहसा जेवल्यानंतर खावे. कारण खरबुजामुळे जेवण उत्तमरीत्या पचते.
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे
– खरबूज हे थंड असतं. या फळाच्या सेवनानं शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. खरबुजातील साखरेचं पचन सहज होऊन शरीराला ऊर्जा मिळते.
– हे फळ उष्णतेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
– आम्लपित्त झाले असेल किंवा कायम होत असेल तर खरबूज भरपूर खावे.
– खरबुजाच्या सालीचा उपयोग मूत्रावरोधामध्ये होतो.  सालीसह खरबूज पाण्यात कुस्करून, गाळून ते पाणी रुग्णाने प्यायल्यास लघवी भरपूर व साफ होते.
– खरबुजांच्या बियांमध्ये प्रथिने जीवनसत्त्वे व पौष्टिक घटक असतात. बियांमधून निघणारे तेल गोड व आहारामध्ये उपयुक्त असून पोषक व सारक असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.