Amla Juice For Skin: आवळ्याला आयुर्वेदात अमृतसमान मानले जाते. कारण- त्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. त्यात क जीवनसत्त्वासह अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चेहरा चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात जर तुमच्या त्वचेची चमक कमी झाली असेल, तर तुम्ही सकाळी आवळ्याने सेवन करू शकता. त्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या चमकू लागेल.
आवळ्याचा रस पिण्याचे फायदे
आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचा घट्ट होते. त्यात असलेले जीवनसत्त्व शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
आवळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा सुधारते आणि तरुण आणि चमकदार राहते.
त्यात अनेक जीवाणूविरोधी गुणधर्म आहेत, जे मुरमे कमी करण्यास मदत करतात. सकाळी आवळ्याचे सेवन केल्याने सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसानदेखील कमी करणे शक्य होते.
आवळ्याचा रस कसा बनवायचा?
आवळ्याचा रस बनण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या बिया काढून, त्याचे लहान लहान तुकडे करा. आता ते तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याच्या मदतीने रस गाळून घ्या आणि तो प्या.
आवळ्याचा रस कसा घ्यावा?
आवळ्याचा रस पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. तुम्ही हा रस रिकाम्या पोटी पिऊ शकता. आवळ्याचा रस प्यायल्यानंतर पुढील ३० मिनिटे काहीही खाऊ नका.