बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आपल्या चेहर्‍यावर होत असतो. आता उन्हाळा सुरू झाला असून उष्णता देखील वाढली आहे. त्यामुळे याचा आपल्या चेहर्‍यावर जास्त परिणाम होतो. मुरूम, चेहर्‍यावर डाग पडणे, अशा अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेचे नुकसान झाल्यानंतर काळजी घेण्याऐवजी आधीपासूनच स्किन केअर रुटीनचे पालन करावे. बरेच जण त्वचेसाठी साबण, फेस वॉश तसंच बॉडी लोशनचा वापर करतात. पण यातील केमिकलमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होते. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टऐवजी आयुर्वेदिक हळदीचा वापर करावा. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हळदीचा वापर संवेदनशील त्वचेसाठी देखील प्रभावी आहे. हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो, तसेच त्वचा निरोगी राहते. हळदीची पेस्ट चेहऱ्यासाठी कशी फायदेशीर आहे आणि ती कशी वापरायची ते जाणून घेऊया.

हळदीच्या वापराणे त्वचेवर होणारे फायदे

हळदीची पेस्ट त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. हळद ही एक नैसर्गिक अँटी-एजिंग आहे जे त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकते आणि त्वचेतील कोलेजनला प्रोत्साहन देते. कोलेजन वाढल्याने त्वचा घट्ट आणि तरुण दिसते.

चेहर्‍यावरील मुरूम कमी करण्यास होते मदत

जर तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रास होत असेल तर चेहऱ्यावर हळद आणि दुधावरील साय मिक्स करून लावा. मुरुमांवर हळद वापरल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर होतात.

घरगुती हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

एक चमचा बेसन, चिमूटभर हळद, ऑलिव्ह ऑईल, मध

असा तयार करा हळदीचा फेसपॅक

हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा.

आता या पेस्टमध्ये त्यात ऑलिव्ह ऑईलचे ५-६ थेंब टाका आणि हळदीची ही पेस्ट चांगल्या पद्धतीने मिक्स करा, अशा रीतीने घरगुती हळदीचा फेसपॅक तयार आहे.

आता तयार केलेली ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी प्रथम चेहरा स्वच्छ करा आणि ही पेस्ट चेहऱ्यापासून मानेपर्यंत २० मिनिटे लावा. नातर ही पेस्ट पुर्णपणे सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा. तसेच तयार केलेली हळदीची पेस्ट तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरा, त्वचेत फरक दिसून येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apply this face pack of turmeric on your face and get beautiful skin know the method of preparation and its benefits scsm
First published on: 16-03-2022 at 14:47 IST