ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा परिवर्तन कालावधी असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी निश्चित वेळ असते. नवग्रहांमध्ये शनि ग्रह मंद गतीने संक्रमण करतो. या ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनि हा मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह आहे. दुसरीकडे, तूळ ही त्यांची उच्च राशी आहे आणि मेष ही त्यांची निच्च राशी आहे.२९ एप्रिल २०२२ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशीत शनिचे भ्रमण सुरू होताच काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नशीब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. व्यावसायिक जीवनात लाभ मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील. तुम्हाला हवी असलेली नोकरीही मिळू शकते.

सिंह: शनि ग्रहाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात आर्थिक स्थिती कमालीची सुधारण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी काळ खूप अनुकूल असेल. भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील.

कन्या: शनीचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. कायदा, चार्टर्ड अकाऊंटन्सी आणि प्रशासकीय नोकरीची तयारी करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांना या काळात नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा कालावधी सकारात्मक परिणाम देऊ शकतो. या काळात तुम्ही तुमचे अडकलेले पैसे यशस्वीपणे काढू शकाल.

Astrology: ३० डिसेंबरला शुक्र करणार गुरूच्या राशीत प्रवेश; २०२२ या वर्षात ४ राशींना मिळणार नशिबाची साथ

धनु: शनीच्या भ्रमणात धनु राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती कमालीची सुधारण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यामध्ये सकारात्मक परिणाम देखील दिसू शकतात. एप्रिल महिन्यात शनि तुमच्या दुसर्‍या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला या काळात अचानक लाभ किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.