ऑडी असे जरी म्हटले तरी आपल्या सगळ्यांच्या भुवया उंचावतात. श्रीमंतांची कार म्हणून ओळखली जाणारी ही कार आता इतरांच्याही बजेटमध्ये बसू शकेल. आता हे कसे काय, तर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. ऑडी कंपनीकडून त्यांच्या काही खास मॉडेल्सवर ८.८५ लाख रूपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या ऑडी रश नावाच्या या ऑफरनुसार ग्राहकांना आकर्षक सूट आणि ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. ही ऑफर लिमिटेड असून देशातील सर्वच ऑडी डिलरकडे ही ऑफर उपलब्ध असणार आहे. या मॉडेल्सवर डिस्काऊंट दिल्यानंतर कंपनीने नवीन किंमत जारी केली आहे. डिस्काऊंटनंतर ऑडी ए३ या कारची किंमत २६.९९ लाख रूपये झाली आहे. ऑडी ए४ ची किंमत ३३.९९ लाख रूपये, ऑडी ए६ ची किंमत ४४.९९ लाख आणि ऑडी क्‍यू३ ची किंमत २९.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. ऑडी रश ही ऑफर केवळ पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांसाठीच असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

आता ८.८५ लाख इतकी सवलत ही खरंच ग्राहकांसाठी संधी ठरणार आहे. मात्र, कंपनीने अशाप्रकारे आपल्या मॉडेल्सच्या किंमती इतक्या वेगाने कमी करण्यामागचे नेमके कारण काय ते अद्याप समजू शकले नाही. विशेष म्हणजे ग्राहक आपल्याला आवडणाऱ्या ऑडी कंपनीच्या गाडीची खरेदी २०१७ मध्ये करुन त्याचे पैसे २०१९ पासून भरु शकतात. त्यामुळे जे ऑडी घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम संधी ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audi company offering exciting discounts upto rs 8 85 lakh on selected models in india
First published on: 02-12-2017 at 16:07 IST