सध्या उन्हाचा पारा वाढत चालला आहे त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहे. उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण वाढलेल्या तापमानामुळे पदार्थ लवकर खराब होतात त्यामुळे ताजे अन्न बनवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा सकाळी केलेली भाजी रात्रीपर्यंत खराब होऊ जाते. त्यामुळे भाजी दिवसातून दोन- चार वेळा चांगली गरम करण्याचा सल्ला दिला जातो. दुध देखील उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोन वेळा चांगळे उकळून घेतले नाही तर खराब होऊ शकते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात मळून ठेवलेले चपात्याचे पीठ लवकर खराब होऊ शकते.

अनेकदा ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून महिला रात्रीच कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे किचनमध्ये फार वेळ महिलांना थांबावे वाटत नाही त्यामुळे सकाळी दोन्ही वेळच्या चपात्याचे पीठ मळून ठेवतात.पण सकाळी मळलेली कणीक उन्हाळ्यात काळी पडू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असे करणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते कारण उष्णतेमुळे कणीक खराब होऊ शकते. अशा कणकेच्या पोळ्या चुकूनही खाल्या तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी काय करावे असा प्रश्न अनेकदा गृहिणींना पडतो. येथे छोटीशी ट्रिक सांगितली आहे जी वापरून तुम्ही चुटकी सरशी ही समस्या सोडवू शकता.

हेही वाचा – तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा

तुम्हाला फार काही कष्ट घ्यावे लागणार नाही किंवा कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाही. तुम्हाला कणिक मळताना फक्त साध्या पाण्याऐवजी बर्फ किंवा बर्फाचे पाणी वापरायचे आहे. त्यामुळे कणिक बराच वेळ थंड राहाते आणि उन्हाळ्यात लवकर खराब होत नाही. बर्फ टाकून मळलेल्या कणकेच्या पोळ्या मऊ होतील. कणीक घट्ट मळून घ्या आणि त्यावर दोन-तीन चमचे पाणी टाका. जेव्हा तुम्ही पोळ्या लाटण्यापूर्वी कणीक पुन्हा मळून घ्या.


हेही वाचा –पाण्यामध्ये फक्त या २ गोष्टी टाका अन् करा मिक्सरची सफाई, नव्यासारखा होईल चकचकीत, पाहा भन्नाट Kitchen Jugaad

युट्यूबवर Maa, yeh kaise karun? नावांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही ट्रिक उपयूक्त आहे का नाही हे स्वत: वापरून पाहा.