डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वेध लागतात, ख्रिसमस आणि न्यू इयर पाटर्य़ाचे. नवीन वर्षांचं थाटात स्वागत करायचं निमित्त पार्टी करण्यासाठी पुरेसं असतं. जिथे पार्टीचा विषय येतो, तिथे शॉिपग, नवीन लुक, नवी स्टाइल ही आलीच. अर्थात पण चालू वर्षांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कपडय़ांची खरेदी करायची, म्हणजे ते ‘लेटेस्ट ट्रेंड’चे असलेच पाहिजेत. नाही तर पुढच्या दोन महिन्यांमध्ये हे कपडे ‘आऊटडेटेड’ होतात. म्हणूनच येत्या काळातही ‘ट्रेंड’मध्ये राहतील, अशा पोशाखांबद्दल जाणून घेतले पाहिजे.

सध्या सगळ्यांना रविवारी येणाऱ्या ख्रिसमसचे वेध लागले आहेत. त्यातच यंदा ख्रिसमस, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत. अशी पार्टी म्हटलं की, केवळ आधुनिक पोशाख असून फायदा नाही तर, तो ‘ट्रेंडी’ आणि ‘स्टायलिश’ही असला पाहिजे. पार्टीवेअर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर वन पीस ड्रेस येतात. किंचित फ्लेअर असलेले, साधारणपणे गुडघ्याच्या उंचीचे गोंडस वन पीस ड्रेस म्हणजे कोणत्याही पार्टीसाठी उत्तम. अर्थात त्यातही पर्याय खूप आहेत. यंदा ड्रेसेसच्या पलीकडे सुद्धा पार्टीवेअर मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. स्कर्ट्स, जंपसूट्स, जॅकेट्स, सूट्स असे बरेच पर्याय सध्या पार्टीवेअरमध्ये आहेत. त्यांचा विचार नक्कीच करू शकता.

सिक्वेन्स शाइन

यंदाच्या सीझनचा सगळ्यात मोठा ट्रेंड म्हणजे सिक्वेन्स, गोल्ड फिनिश, ग्लिटर ड्रेसेस. एरवी दागिने, अ‍ॅक्सेसरीजपर्यंत मर्यादित राहणारा गोल्ड रंग कपडय़ांमध्ये उतरला आहे. सोनेरी किंवा चंदेरी ड्रेसला सध्या प्रचंड मागणी आहे. फक्त ड्रेस नाही, तर जॅकेट, लेिगग, स्कर्टमध्येही हा झगमगाट पाहायला मिळेल. अर्थात हे ड्रेस घालताना आपल्याला सोन्याची ‘बेबी डॉल’ व्हायचं नाही आहे, हे लक्षात असू द्यात. त्यामुळे सोनेरी स्कर्ट किंवा लेिगगसोबत पांढरा किंवा काळ्या रंगाचा शर्ट आणि एखादं स्पोर्टी जॅकेट घालून सोनेरी रंगाचा भडकपणा कमी करू शकता. सिक्वेन्स ड्रेससोबत शूज बेसिक काळ्या किंवा न्यूड रंगाचे असू द्यात. अगदी पार्टीमध्येसुद्धा या ड्रेससोबत तुम्ही सफेद स्नीकर्स घालू शकता. ऑफिसवरून एखाद्या पार्टीला जायचं असेल, तर सोबत एक सोनेरी जॅकेट ठेवू शकता. फॉर्मल ट्राऊझर आणि शर्टला सुद्धा हे जॅकेट ग्लॅमरस लुक देतं.

लिटिल ब्लॅक ड्रेस

लिटिल ब्लॅक ड्रेस ही संकल्पना खरं तर पन्नासच्या दशकातली, पण आजही पार्टीजमध्ये त्याने त्याचं वर्चस्व कायम ठेवलं आहे. यंदाच्या सीझनमध्ये रिलॅक्स फिटचे सिक्वेन्स ब्लॅक ड्रेस ट्रेंडमध्ये आहेत. याशिवाय शिफ्ट ड्रेस किंवा न्यूडल स्ट्राप ड्रेससुद्धा तुम्ही वापरू शकता. यंदा पार्टीला जाताना हाय हिल्स घालण्यापेक्षा मस्त स्निकर्स घालून स्पोर्टी लुक कॅरी करू शकता. यंदा लिटिल व्हाइट ड्रेससुद्धा ट्रेंडमध्ये आहे. एरवी पार्टीजमध्ये सहसा वापरला न जाणारा सफेद रंग या वर्षी आवर्जून वापरा.

स्कर्ट अफेअर

पार्टीवेअर लुक्समध्ये सध्या स्कर्ट्सचे वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. अर्थात यात सगळ्यात भाव खाणारा प्रकार म्हणजे सोनेरी प्लिटेड स्कर्ट. पण त्यासोबतच टय़ूल स्कर्ट, फ्लेअर स्कर्ट तुम्हाला यंदा प्रामुख्याने पहायला मिळतील. टय़ूल या पारदर्शी कापडाचे पदर असलेला टय़ूल स्कर्ट तुम्हाला थेट डिस्ने प्रिन्सेसच्या दुनियेत घेऊन जाईल. या सिंपल स्कर्टसोबत तुम्ही प्लेन कॉन्ट्रास्ट शेडचा क्रॉप टॉप किंवा शर्ट कॅरी करू शकता. याशिवाय िपट्रेड स्कर्टसुद्धा बाजारात आले आहेत. िपट्रेड फ्लेअर स्कर्टसोबत फिटेड टी-शर्ट आणि एखादा लूझ समर शर्ट ड्रेस जॅकेट म्हणून घालू शकता.

बोल्ड जंपसूट

ऑफिस पार्टीमध्ये काय घालायचं? हा प्रश्न जर तुम्हाला असेल, तर बोल्ड शेडचा जंपसूट हे तुमचं उत्तर ठरू शकतं. फॉर्मल पार्टीजमध्ये ड्रेसकोडच पाळावा लागतो. पण त्याचंबरोबर तुमचा लुक उठून दिसेल, हेही महत्त्वाचं असतं. अशा वेळी निळा, लाल, पिवळा, जांभळा, नारंगी अशा बोल्ड रंगाचा जंपसूट तुम्ही वापरू शकता. अर्थात तो निवडताना तुमच्या स्किनकलरचा विचार कराच. अगदीच सेफ प्ले करायचा असेल, तर पांढरा किंवा काळा जंपसूट आणि त्यावर स्टायलिश जॅकेट घालू शकता. जंपसूटसोबत मस्त बेल्ट असणं गरजेचं असतं. त्याचंबरोबर हिल्सचे शूज यासोबत छान दिसतात.

कुठे मिळेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मुंबईच्या प्रत्येक मॉलमध्ये पार्टीवेअर लुक पाहायला मिळेल. यांच्या किमती सधारणपणे १०० रुपयांपासून सुरू होतात. तसचं बांद्रा, लोखंडवालाच्या स्ट्रीट शॉिपग मार्केटमध्येही स्वस्तात मस्त असे कपडय़ांचे पर्याय तुम्हाला मिळतील.